व्हाॅईस ऑफ मिडीया पाथरी तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी गजानन घुंबरे तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ वाव्हळे

0 41

पाथरी,दि 02 (प्रतिनिधी) :
व्हाॅईस ऑफ मिडिया पाथरी तालुका कार्यकारिणी निवडीसाठी सोमवार 2 जानेवारी रोजी पाथरी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी व्हाॅईस ऑफ मिडिया च्या तालुकाध्यक्षपदी गजानन घुंबरे तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ वाव्हळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व्हाॅईस ऑफ मिडिया ही संघटना पत्रकार आणि पत्रकारितेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे आरोग्य, तालुका स्तरावर पत्रकार भवन, पत्रकारांना घरे यासाठी देशभर मोठे काम सुरू आहे.
व्हाॅईस ऑफ मिडिया चे जिल्हाउपाध्यक्ष विठ्ठल भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी येथे सोमवार 2 जानेवारी रोजी दुपारी 12 वा . आयोजीत बैठकीत पाथरी तालुका कार्यकारीणी गठित करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी गजानन घुंबरे, कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ वाव्हळे, उपाध्यक्ष नागनाथ कदम, उपाध्यक्ष सुनील उन्हाळे, सरचिटणीस धनंजय देशपांडे, सहसरचिटनीस रमेश बिजुले, कोषाध्यक्ष सुधाकर गोंगे, कार्यवाहक गणेश गिराम, संघटक लक्ष्मण उजगरे, प्रसिद्धी प्रमुख मोहन धारासूरकर, सदस्य गणेश गिराम, संतोष कुलभैय्या, भगवान दुगाने, हनुमान चव्हाण
यांची सवार्नुमते निवड करण्यात आली. दरम्यान व्हाॅईस ऑफ मिडिया चे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल भिसे यांनी गजानन घुंबरे यांचे नाव तालुकाध्यक्ष पदासाठी सुचविले त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन देत पाठिंबा दर्शविला. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष भिसे यांनी व्हाॅईस ऑफ मीडियाच्या कामाबद्दल सखोल मार्गदर्शन करत पत्रकारांच्या आगामी काळाचा लेखाजोखा मांडला.
सुधाकर गोंगे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन रमेश बिजुले यांनी मानले.

error: Content is protected !!