सर्व्हे नंबर १४८ च्या दोषींवर कार्यवाहीसाठी प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा

0 224

सेलू, प्रतिनिधी – सर्व्हे नंबर १४८ मधील जमिनीवर कल्चर सेंटर ( वाचनालयासाठी ) आरक्षित असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या पाडण्यात आलेल्या प्लॉट बद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती .त्यानुसार न प प्रशासनाकडून सदरील प्लॉट चे पी टी आर व विक्री थांबवण्यात आली आहे .परंतु अजूनही सदरील जागेवर जागा आरक्षणाचा फलक लावण्यात आला नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही झाली नाही .

तरी त्वरित ही कार्यवाही पूर्ण करावी व तात्काळ कार्यवाही न केल्यास २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी उपजिल्हाधिकारी सेलू यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा किशोर बालाजी मुक्तावार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .

error: Content is protected !!