विकास कामांसाठी नगर परिषदेला भरघोस निधी उपलब्ध करुन देवू- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

0 71

पूर्णा, केदार पाथरकर – नगरपालिका पालिका सभागृहातून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजे . विकासकामांबाबत आपल्या खात्यामार्फत आपण निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दि 15 नोव्हेंबर रोजी व्यक्त केले.

पूर्णा नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण तसेच नगरपालिका नूतन इमारत, छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलन शुभारंभ कार्यक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी प्रमुख उपस्थितीत भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, खासदार संजय जाधव,आ राहुल पाटील,जिल्हाप्रमुख तथा उपाध्यक्ष विशाल कदम, आ.विपलव बीजुरीया,आ रत्नाकर गुट्टे, नांदेड चे आमदर बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल ,नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे,प्रकाश कांबळे,उत्तम खंदारे, संतोष एकलारे श्याम कदम,नितीन कदम,साहेब कदम आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरनाचे काम, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण पालिका इमारतीचे उदघाटन कार्यक्रम एकापाठोपाठ पार पडले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी महापुरुषांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण करावे अशी भावना व्यक्त केली तर सिद्धार्थ नगर ते बुद्ध विहार या पदचारी पुलासाठी राज्य शासनाकडे पाठपुरवठा करनार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नगरपालिका इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा,उद्यान व इतर कामासाठी निधी तातडीने उपलब्ध करू असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमास शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पोलोस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Content is protected !!