मास्क्ड आधार कार्ड काय आहे? जाणून घ्या फायदे?

0 51

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड ज्यामध्ये 12 अंकी क्रमांकाऐवजी केवळ शेवटचे 4 क्रमांक दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्क्ड आधारची कन्सेप्ट सुरू केली, जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे. हे मिळवणे खूप सोपे आहे आणि यूआयडीएआय वेबसाइटवर जाऊन काही आवश्यक माहिती देऊन सहज डाउनलोड केले जाऊ शकते. eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.

lok11

आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल?

* सर्वप्रथम eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
* संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका.
* तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा पर्याय निवडावा.
* स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा.
* त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा.
* ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील आणि डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील.

shabdraj reporter add

आधार कार्डाची पडताळणी कशी कराल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा.
* पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
* त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
* यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा.
* तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या.
* याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

error: Content is protected !!