क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

0 371

 

हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या सत्तेत असणारं मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नवीन विधेयकानुसार भारतामध्ये सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. काही अपवाद वगळता सर्व चलनांवर बंदी घालून आभासी चलनासंदर्भातील व्यवहार नियमन करण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र या क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील विधेयकाच्या वृत्तामुळे क्रिप्टोकरन्सी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. अनेकांना क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय हेच ठाऊक नाहीय. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. तर चला त्याबद्दल जाणून घेऊया…

डिजिटल होत चाललेल्या या युगात cryptocurrency हा नवीन भाग आता जोडला जात आहे, पण लोकांना त्याबद्दल अजून देखील बरेच प्रश्न आहेत, जसे क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? क्रिप्टोकरन्सी संरक्षित असते का इत्यादी…

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (what is crypto currency)
क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल अॅसेट (Digital Asset) आहे, जो वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरला जातो. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असं काही नसतं. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. प्रत्येक देशाचं स्वतःचं असं एक चलन असतं. जसं भारताचं चलन रुपया आहे. सौदी अरेबियाचं रियाल आणि अमेरिकेचं डॉलर हे चलन आहे. इतर देशांकडेही त्यांचं स्वतःचं चलन आहे. तसंच क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.

क्रिप्टोकरन्सीला मराठी मध्ये आभासी चलन (Virtual currency) असे म्हणतात. पहिली बिटकॉइन २००९ मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. क्रिप्टोकरन्सी हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक स्वतंत्र चलन आहे व त्याचा कोणीही मालक नाहीय.

रुपये, डॉलर, युरो, जापानी येन किंवा इतर चलनांप्रमाणेच हे चलन कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही सरकारचे चलन नाही आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. सामान्यत: याचा वापर वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

या चलनाच्या मदतीने पैसे खूप सहज लपविले जाऊ शकतात. ह्याच्या वापरासाठी कोणत्याही बँक किंवा इतर सरकारी संस्थेला भेट देण्याची गरज नसते. म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने आपले पैसे सहज लपविले जाऊ शकतात. हे डिजिटल चलन “पिअर टू पिअर इलेक्ट्रॉनिक” (PEER TO PEER Electronic) पद्धतीने कार्य करते. याचा उपयोग इंटरनेटच्या मदतीने करता येतो.

अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.

अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.

डिजिटल चलनासाठी आरबीआयची तयारी?
या वर्षी २५ जानेवारी रोजी आरबीआयने पेमेंट सिस्टमसंदर्भात एक पुस्तिका जारी केली होती. त्यात म्हटले आहे की, आरबीआय नवीन डिजिटल चलन किंवा रुपयाच्या डिजिटल आवृत्तीला क्रिप्टोकरन्सीचा दर्जा देण्याची शक्यता तपासेल. या वर्षी लोकसभेच्या बुलेटिनमध्ये असे म्हटले होते की क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन विधेयक २०२१ चे नियमन भारताच्या अधिकृत डिजिटल चलनाचा मार्ग मोकळा करेल. यासाठी आरबीआय फ्रेमवर्क तयार करेल.

क्रिप्टोकरन्सी कराच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार आयकर कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात हे बदल केले जाऊ शकतात. महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली. महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले, “काही लोक आधीच क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर भांडवली नफा कर भरत आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संदर्भातही कायदा ‘अगदी स्पष्ट’ आहे. मात्र, आता क्रिप्टोचा व्यापार खूप वाढला आहे. अशा स्थितीत कायद्यात काही बदल करता येतात की नाही ते पाहू. हे सर्व येत्या अर्थसंकल्पातच होईल.

क्रिप्टो ट्रेडिंगवर (digital trading) कर आकारला जाऊ शकतो
क्रिप्टो ट्रेडिंगसाठी TCS (टॅक्स कलेक्टेड सोर्स) ची तरतूद सुरू केली जाऊ शकते का असे विचारले असता? बजाज म्हणाले, ‘आम्ही नवीन कायदा आणला तर काय करायचे ते पाहू. पण होय, जर तुम्ही पैसे कमावले तर तुम्हाला कर भरावा लागेल.

इतर सेवांप्रमाणेच क्रिप्टोवरही जीएसटी लागू होईल
क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगवरील जीएसटी दराबाबत बजाज म्हणाले की जीएसटीची व्याप्ती खूप वाढली आहे. व्यापाराशी संबंधित सर्व सेवांवर सध्या GST दर निश्चित केले आहेत आणि हे पूर्णपणे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जर आपण क्रिप्टो ट्रेडिंगवर जीएसटीबद्दल बोललो, तर जर कोणी मध्यभागी ब्रोकर म्हणून काम करत असेल आणि त्याने ब्रोकरेज आकारले तर त्या सेवेवर जीएसटी आकारला जाईल.

सरकार हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोवर विधेयक आणू शकते
२९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडण्याची शक्यता आहे. सध्या देशात क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही नियम नाहीत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात क्रिप्टोकरन्सीबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि मजबूत नियामक पावले उचलण्याचे संकेत दिले.

भारतातील क्रिप्टोकरन्सीचे नियम
देशात क्रिप्टोकरन्सीचे चलन वेगाने वाढले आहे, परंतु याबाबत देशात कोणताही कायदा किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. २०१८ मध्ये आरबीआयने क्रिप्टोकरन्सीबाबत एक परिपत्रक जारी केले. यामध्ये आरबीआयने सर्व वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सीशी संबंधित सेवा देण्यास बंदी घातली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयने घातलेली बंदी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतात क्रिप्टोकरन्सीचा व्यापार सुरू आहे. सरकारने २०१९ मध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी एक विधेयकही तयार केले होते. मात्र, हे विधेयक संसदेत मांडता आले नाही.

बिटकॉइन (bitcoin) व्यतिरिक्त लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी (popular cryptocurrnecy)
इथर :
ही जगातील दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. हे २०१५ मध्ये विटालिक बुटेरिन यांनी तयार केले होते. त्याने इथरियम नावाचे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म विकसित केले. हे प्लॅटफॉर्म केवळ इथर नावाच्या आभासी चलनापुरते मर्यादित नाही, तर इतर लोक इथरियमची ब्लॉकचेन प्रणाली वापरणारे त्यांचे स्वतःचे अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकतात.

रिपल :
आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशाच्या व्यवहाराची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने २०२१ मध्ये रिपल विकसित केले गेले. Ripple द्वारे पैसे हस्तांतरण खूप जलद आहे आणि त्याची किंमत देखील खूप कमी आहे. Ripple चे नियंत्रण Ripple Labs नावाच्या कंपनीद्वारे केले जाते, ज्यांच्याकडे Ripple च्या सर्व चलनांपैकी अर्धे चलन आहे.

लाइटकॉइन :
Google चे माजी कर्मचारी चार्ली ली यांनी २०११ मध्ये Litecoin तयार केले. या कामात बिटकॉइनच्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. बिटकॉइन बनवण्यामध्ये आणि देखरेखीमध्ये असणारी अफाट शक्ती आणि जटिलता काढून टाकून हलके चलन तयार करणे हा यामागचा उद्देश होता.

निओ :
ही चिनी बनावटीची क्रिप्टोकरन्सी आहे, जी २०१४ मध्ये दा होंगफेईने तयार केली होती. सुरुवातीला त्याचे नाव Entshares होते जे जून २०१७ मध्ये बदलून निओ करण्यात आले.

 

 

error: Content is protected !!