whatsapp trick : एकाच वेळी अडीचशे जणांना पाठवा मेसेज

0 646

आजकाल WhatsApp , टेलिग्राम, फेसबुक अ‍ॅप्सद्वारे अधिक संभाषण होत आहे. चॅटिंगच्या माध्यमातून संवाद साधला जातो. WhatsApp हे आजच्या युगात संवाद साधण्याचं प्रभावी आणि अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप बनले आहे. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

pune lok1

सोशल मीडियावर नेहमी आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नेहमी बदल पाहायला मिळत असते. ग्राहकांच्या प्रतिक्रियांवरून व्हॉट्सअ‍ॅप सतत बदल करून युजर्सना जे हवे आहे ते देण्याचे प्रयत्न करत असते. ऑनलाईन पेमेंट प्रणाली, व्हिडिओ कॉलिंग, फोटो, गाणी, व्हिडिओ, ग्रुप कॉल, स्टेटस अशा अनेक सुविधा आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पाहायला मिळतात. काही दिवसांपुर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस फिचर्समध्ये बदल केले असून, आता मात्र व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक बदल पाहायला मिळणार आहे.

shabdraj reporter add

व्हॉट्सऍपवर मेसेज किंवा फोटो-व्हिडीओ पाठवायचे असेल तर एकाच वेळी फक्त पाचच जणांना पाठवू शकतो. जर तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा इतरांना पाठवायच्या असतील तर पुनः पुन्हा कॉण्टॅक्ट्स निवडावे लागतात. मात्र आता व्हॉट्सऍपमधून एकाच वेळी 250 जणांना मेसेज पाठवता येणार आहे. त्यासाठी फक्त ही सोपी ट्रिक वापरावी लागणार आहे.

एकाच वेळी अनेकांना मेसेज कसा पाठवायचा?
सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन घ्या. त्यानंतर तुमचे WhatsApp ओपन करा. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पहा, तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्स च्या पर्यायावर क्लिक करा. आता New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment आणि Settings चा पर्याय दिसेल. यानंतर New Broadcast च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही २४० लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर २५० जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.

error: Content is protected !!