हिंगणघाटमध्ये स्वयंपाक करताना गॅस गळती स्फोटात संसारपयोगी साहित्य जळुन खाक

0 175

हिंगणघाट,दि 13 (प्रतिनिधी)ः शहरातील शास्त्री वार्ड, शासकीय गोदामा जवळ एका घरात स्वयंपाक करताना गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात संसारपयोगी साहित्य जळुन खाक झाले.
सौ वर्षा राजकुमार खोब्रागडे या संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान घरी स्वयंपाक करताना गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर इथून गॅस गळती होऊन आग लागली.त्यामुळे खोब्रागडे या ताक्ताळ घराबाहेर पडल्या,त्यानंतर अवघ्या क्षणात  गॅसचा स्फोट झाला.सुदैवाने कोणालाही इजा झाली नसुन या घटनेत घरातील भिंतीला तडा गेला आहे. तसेच फ्रीज, कूलर, फॅन, मिक्सर, भांडी ठेवायची रॅक व इतर सामाना चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही लगेच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.सिलेंडरचा स्फोटाची माहिती घेतली असता सिलेंडर हे सत्यश्री गॅस एजन्सी येथून दुपारी 4 वाजता आणण्यात आले तसेच ते लावले 8 वाजताच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर पासून पेट घेतला.

error: Content is protected !!