कालीचरण महाराज कोण आहेत? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध ?

0 376

शब्दराज वेब टीम – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील धर्मसंसदेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारणारे कालीचरण महाराज हे महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.

‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मूळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’ असं आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.

आठवीपर्यंतच शिक्षण
४८ वर्षीय कालीचरण महाराज यांचे शिक्षण शहरातील पेठ भागातील नगर जिल्हा परिषद शाळेत झाले. मात्र, त्यांनी केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याला जवळून ओळखणाऱ्यांचे म्हणणे आहे की तो शाळेत गेला नसला तरी त्याने अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे.

मराठीसह हिंदीवर चांगली हुकूमत
कालीचरण महाराजांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या मावशीच्या घरी म्हणजेच इंदूरला त्यांच्या लहानपणी आर्थिक अडचणींमुळे पाठवले होते. त्यामुळेच मराठी भाषिक असूनही त्यांची हिंदीवर चांगली पकड आहे.

भैय्युजी महाराजांसोबत इंदूरमध्ये अनेक वर्षे राहिले
इंदूरमधील वास्तव्यादरम्यान, कालीचरण भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले आणि लवकरच त्यांच्या जवळ आले. येथून त्यांच्या नवीन नावाशी ‘महाराज’ हा शब्द जोडला गेला आहे. इंदूरमध्ये अनेक वर्षांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी एक अनोखा पोशाख धारण केला आणि लवकरच ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.

कालीचरण महाराज आपल्या कपाळावर लावतात लाल ठिपका
कालीचरण महाराज नेहमी आपले केस उघडे ठेवतात आणि कपाळावर एक मोठा लाल ठिपका ठेवतात. ते सहसा लाल रंगाचे कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

शिव तांडव स्रोतातून प्रसिद्धीच्या झोतात
महाराष्ट्रातील अकोला येथे दरवर्षी कालीचरण कंवर यात्रेत भाग घेतात. कालीचरण महाराज गेल्या वर्षी मध्य प्रदेशात शिव तांडव स्तोत्र गाऊन प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अभिनेता अनुपम खेर यांनीही त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

error: Content is protected !!