देशाचे पुढील पंतप्रधान कोण ? भाजपात मोदींना पर्याय कोण? आज लोकसभा निवडणूक झाली, तर NDA ला किती जागा? सर्वेक्षणातून माहिती समोर…

0 680

नवी दिल्ली – इंडिया टुडे Cvoter मुड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील सर्वेक्षणातील सहभागी व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मूल्यांकन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक अशी पसंती मिळाली आहे, ती म्हणजे ओरिसाच्या नवीन पटनाईक यांना. जवळपास ७१.१ टक्के इतक्या लोकांनी नवीन पटनाईकांच्या कामगिरीला अव्वल ठरविले आहे. तर ममता दीदींना जवळपास ६९.९ टक्के लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर पसंती दिली आहे. तर तामिळनाडूच्या स्टॅलिन यांना ६७.५ टक्के इतकी पसंती मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पसंतीत घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरेंना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना ६१.८ टक्के इतकी पसंती मिळाली आहे. तर केरळच्या पिनरयी विजयन यांना ६१.१ टक्के इतकी पसंती मिळाली.

1- नरेंद्र मोदी सरकारवर किती लोक समाधानी आहेत?
सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवलेल्यांपैकी 59 टक्के लोकांनी सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. तर 26 टक्के लोक असमाधानी असल्याचे सांगतात. या सर्व्हेनुसार, 63 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले काम केलंय, असे मान्य करतात. तर 15 टक्के लोक म्हणतात मोदींनी सुमार कामगिरी केली आहे. तर 21 टक्के लोकांना अत्यंत वाईट कामगिरी वाटतेय.

2- देशाचे पुढचे पंतप्रधान कोण?
या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 52.5 टक्के लोकांनी या प्रश्नावर नरेंद्र मोदी हेच उत्तर दिले आहे. तर 6.8 टक्के लोकांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे पुढील पंतप्रधान असतील, असे उत्तर दिलंय. तर 5.7 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ, 3.5 टक्केंनी अमित शहा आणि 3.3 टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांचे नाव घेतले.

shabdraj reporter add

3- निवडणूक होणाऱ्या राज्यांत मोदी किती लोकप्रिय?
या प्रश्नाचे उत्तर देताना लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशात जास्त लोकप्रिय असल्याचे सांगितले आहे. 75 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर समाधानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मणिपूर आहे. तेथील 73 टक्के लोक मोदींवर खुश आहेत. गोव्यातील 67 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर उत्तराखंडमधील 59 टक्के लोकांनी मोदींना चांगलं म्हटलं. पंजाबमध्ये मोदींना सर्वात कमी रेटिंग मिळालंय. तेथील 37 टक्के लोकांनीच त्यांच्या कामावर खुश असल्याचं म्हटलंय.

4- राम मंदिरचं यश देशासाठी किती मोठं?
अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणे हे मोदींचे सर्वात महत्त्वाचे काम नाही, असे लोकांनी म्हटले आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 15.7 टक्के लोकांनीच राम मंदिर हे खूप मोठे कार्य असल्याचे म्हटले आहे. तर फक्त 12 टक्के लोकांनी काश्मीरमधून 370 कलम हटवण्याला सर्वात मोठे यश म्हटले आहे.

5- मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश कोणते?
सर्व्हेनुसार, मोदी सरकार तीन महत्त्वाच्या गोष्टीत अपयशी असल्याचे समोर आले आहे. यात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आंदोलन या तीन गोष्टींचा समावेश आहे. 25 टक्के लोकांनी महागाई हे सर्वात मोठे अपयश मानले आहे. तर 14 टक्के लोकांनी बेरोजगारी आणि 10 टक्के लोकांनी शेतकरी आंदोलनाला सर्वात मोठे अपयश मानले आहे.

6- सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?
देशात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलंय. ओडिशातील 71 टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्या कामावर 69.9 टक्के लोक समाधानी आहेत. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यावर 67.5 टक्के लोक समाधानी आहेत.

7- भाजपचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?
भाजपच्या देशातील एकूण मुख्यमंत्र्यांपैकी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनाच फक्त 50 टक्क्यांपेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे. सर्व्हेनुसार, त्यांच्यावर 56.6 टक्के लोक समाधानी आहेत. गुजरात, उत्तराखंड, युपी आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे रेटिंगही 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे रेटिंग सर्वात कमी असून ते 27.2% एवढे आहे.

8- मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा फायदा कुणाला?
बहुतांश लोकांच्या मते, मोदी सरकराच्या आर्थिक धोरणांचा सर्वाधिक फायदा उद्योगजगातील घराण्यांना झाला आहे. सर्व्हेनुसार, 47.7 टक्के लोकांच्या मते, एनडीए सरकारच्या आर्थिक धोरणांचा फायदा उद्योगातील घराण्यांना झाला आहे. तर 7.6% लोकांच्या मते लहान व्यावसायिकांनाही याचा फायदा झाला.

9- भाजपात मोदींना पर्याय कोण?
भाजपात नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा सर्वात लोकप्रिय आहेत, असे सर्व्हेतून दिसून आले. त्यांच्या बाजूने 24 टक्के लोकांनी मते दिली. तर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही 23% लोकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा, असा पर्याय दिला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 11% लोकांनी मोदींना पर्याय मानलं आहे.

10- आज लोकसभा निवडणूक झाली, तर NDA ला किती जागा?
आजच लोकसभा निवडणूक झाली तर NDA ला 296 जागा मिळतील. तर युपीएच्या खात्यात 126 जागा येतील. इतर पक्षांना 120 जागा मिळतील, असा अंदाज लोकांनी वर्तवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 67 जागा एनडीएला, सपाला 10 आणि बसपाला 2 तर काँग्रेसला एक जागा मिळेल, असा अंदाज सर्व्हेच्या माध्यमातून देशातील जनतेने व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी लोकप्रियतेत जगात नंबर वन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा डंका पुन्हा एकदा जगात वाजला आहे. अमेरिकन डेटा इंटेलीजन्स फर्म, मॉर्निंग कन्सल्ट पोलिटिकल इंटेलीजन्सने जारी केलेल्या ग्लोबल रेटिंग सर्व्हेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत ७१ टक्के रेटिंग मिळवून अग्रस्थानी असल्याचे म्हटले आहे. मोदी यांच्यानंतर दोन नंबरवर मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस मॅन्यूअल ६६ टक्के तर इटलीचे मारियो ड्रॅगी ६० टक्के मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्व्हेक्षणासाठी जगातील १३ नेत्यांचा विचार केला गेला होता. त्यात अमेरिकेचे जो बायडेन सहाव्या क्रमांकावर, कॅनडाचे जस्टीन टुडो ४३ टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन ४१ टक्के अशी क्रमवारी आहे. नोव्हेंबर मध्ये सुद्धा असेच सर्व्हेक्षण केले गेले होते तेव्हाही मोदीच अग्रस्थानी होते. ही संस्था सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, द. कोरिया, स्पेन, युके आणि युएसए देशाच्या नेत्यांचे रेटिंगवर लक्ष ठेऊन आहे. हे नवे रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२चे आहे.

error: Content is protected !!