निफाड तालुक्यात शिवडी शिवारात वीज कोसळून महिलेचा मृत्यु

0 34

 

निफाड,दि 08 (प्रतिनिधी)ः
 मेघगर्जनेसह विजेचा कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये शेतात काम करत असलेल्या शिवडी तालुका निफाड येथील सौ मंगला क्षीरसागर यांनी झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यु झाल्याची ङटना गुरुवारी (दि.सात) सायंकाळी घडली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शिवडी तालुका निफाड येथील भाऊसाहेब पुर्णाजी क्षीरसागर हे पत्नी सौ.मंगला भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह काल गुरूवार(दि.७)रोजी दुपारी आपल्या शेतात टोमॅटो काढण्यासाठी गेले होते. दुपारी चारच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडू लागल्याने त्यांनी एका झाडाचा आसरा घेतला याचवेळी वीज कोसळल्याने सौ.मंगला भाऊसाहेब क्षीरसागर(४५)यांचे निधन झाले. या घटनेनंतर तात्काळ त्यांना उगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. निफाड पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा शिवडी अमरधाममध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या सौ मंगला शिरसागर यांच्यावर वीज पडून मृत्युमुखी झाल्याची बातमी कळताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. उगावच्या तलाठी फाकटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा करून सविस्तर अहवाल निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना सादर केला आहे.

error: Content is protected !!