सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

0 411

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने पाडून दाखवावंच, या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

lok3

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray’s speech : मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जनतेने नापास करूनही तुम्ही सत्तेत आला आहोत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधनाता म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा संविधान बदलायचा मनसुबा दिसून येत आहे. हे भ्रष्ट्र सरकार आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

shabdraj reporter add

ते शनिवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘ सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यातील सरकार हे वरपास झाले आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर शिवसैनिकाला का मुख्यमंत्री बनवले नाही. तुम्ही महत्वकांक्षी आहात. नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का जावे लागले आहे, असा प्रश्न फडवणीस यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. ज्या बंगालमध्ये युनिनन बाजी, संपामुळेमुळे एकेकाळची आर्थिक राजधानी कोलकता मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. Ed ,cbi चे भय ज्याने काही केले असेल त्याला असेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

error: Content is protected !!