उपविभागीय अधिकारी गंगाखेड सुधीर पाटील यांची वाळूमाफिया यांच्याविरुद्ध धाडसी कारवाई

पालम,प्रतिनिधी – पालम तालुक्यातील पिंपळगाव वाणी येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात गंगाखेडचे एसडीएम श्री सुधीर पाटील यांनी धडक कारवाई करत तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यामुळे वाळूतस्करांची धाबे दणाणले आहेत.

दिनांक 10 जून रोजी पहाटे 4:00 च्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली असून सदरील कारवाईत जप्त केलेले तीन ट्रॅक्टर हे अनुक्रमे शिवराम सोनटक्के, नागेश सोनटक्के व मोहम्मद पठाण यांचे असून तीनही ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी पालम तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गंगामसल्याला मान आषाढी एकादशीपर्यंत इनामदार वाड्यात पालखी , पादुका ठेवल्या

श्री.शरद पवार विचार मंचच्या बीड जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास देशमुख यांची निवड

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

palamparbhaniपरभणी
Comments (0)
Add Comment