संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गंगामसल्याला मान आषाढी एकादशीपर्यंत इनामदार वाड्यात पालखी , पादुका ठेवल्या

माजलगांव( धनंंजय माने):-तालुक्यातील गंगामसला हे गाव श्रीक्षेत्र मोरेश्वर देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे पण संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी व पादुका उचलण्याचा मानसुद्धा या गावाला आहे .

दरवर्षी गावातील शंभरपेक्षा जास्त वारकरी गावातून देहूच्या पालखी सोहळ्याला जात असतात ; पण यावर्षी कोरोनामुळे शासनाच्या निर्णयानुसार फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीमध्ये देहूच्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे प्रस्थान शुक्रवारी ( दि . १२ ) झाले .

तालुक्यातील गंगामसला येथील चार वाड्यांना प्रत्येक वर्षाला पादुका व पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळतो . यावर्षी माऊली सोळंके , कैलास सोळंके यांना असून आज झालेल्या प्रस्थानास त्यांची उपस्थिती होती . येथून पुढे आषाढी एकादशीपर्यंत तुकाराम महाराजांच्या पादुका व पालखी या इनामदार वाड्यामध्ये ठेवल्या जाणार आहेत व हे दोन वारकरी परंपरेनुसार पूजा करणार असल्याची माहिती अशोक सोळंके यांनी दिली आहे .

हे आहेत मानकरी
संत तुकाराम महाराजांचे चौथे वंशज संत नारायण महाराज यांच्यापासून दिंडीची परंपरा सुरू आहे . दरवर्षी महाराजांच्या पादुका घेण्याचा मान सोळंके कुटुंबाला असतो . प्रतिवर्षी बदलत्या वर्तुळाकार पद्धतीने हा मान दिला जातो . अनंत सोळंके , माऊली सोळंके , नारायण सोळंके , किसनराव सोळंके अशी मानाची चार घराणी आहेत .

या असतात जबाबदान्या रथाच्या
व्यवस्थापनासाठी जवळपास पन्नास वारकरी काम करतात . प्रत्यक्ष रथावर वीसजण , पाचजण पावती पुस्तकाचा हिशेब , दिंडी सोहळ्यात रथावर जमा होणाऱ्या रकमेचा चोख हिशेब ठेवणे , प्रत्येक दिवशी संस्थानच्या नावाने बकत रक्कम जमा केली जाते .

परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आषाढी एकादशीपर्यंत तुकाराम महाराजांच्या पादुका व पालखी या इनामदार वाड्यामध्ये ठेवल्या जाणार आहेत व गंगामसला येथील मानाचे वारकरी माऊली सोळंके , कैलास सोळंके नित्यनियमाप्रमाणे व परंपरेने पूजाअर्चा करणार आहेत .

स्वातंत्र्यपूर्व काळापासून परंपरा
गंगामसला येथील शंभरपेक्षा अधिक महिला तर तीनेशहून अधिक वारकरी देहू ते पंढरपूर या पायी दिंडी वारीत दरवर्षी न चुकता सहभागी होतात . पहिल्या क्रमांकावर मसलेकरांच्या दिंडीला मान आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात या पायी दिंडी वारीत अनेक अडचणी आल्या . यावर मात करीत सोळंके घराण्याने दिंडी वारीची परंपरा अविरतपणे दोन वर्षापेक्षाही अधिकचा काळ उलटला तरीदेखील सुरू ठेवलेली आहे .

दै.शब्दराजच्या वृत्तानंतर अखेर गरीबांच्या ताटात पडली दाळ

वडवणी येथील वकील बांधवांना किराणा किटचे वाटप

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment