माजलगांव, धनंजय माने – सरकारने दोनलाख रुपये पर्यंतचे सर्व थकीत शेती कर्जाच्यारक्कमेची महात्मा ज्योतीबा फुले नावाने कर्जमाफी केली आहे. यात माजलगांव तालुक्यातील हजारो शेतकरी पात्र झाले आहेत. टप्प्याटप्याने कर्जमाफीच्या यादी प्रसिध्द करीत मिळालेली कर्जमाफीत शेतकऱ्यांना बँकेच्या खात्याला अंगठा लावून केवायसी करण्याचे सांगितल्याने खाते जोडणी झाली आणि कर्जमाफिच्या पहील्या व दुसऱ्या यादीत नंतर लगेच आठ ते दहा दिवसातच कर्ज खात्यावर पैसे पडले ते कर्जास पात्र झाले. मात्र त्यानंतर मार्च महीन्यात शासनाने तिसरी यादी जाहीर केली. यानंतर लगेच यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी अंगठा लावून केवायसी केली आहे. तरी अद्यापही कर्ज खात्यावर पैसे जमा नझाल्याने माफित नाव असुन केवायसी करून देखील बँका कर्ज देण्यास तांत्रिक बाबी चे कारण सांगत उदासिनता दाखवत आहेत.
तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही मग जुनच्या पहील्या आठवड्यात आलेल्या चौथ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कधी पैसे जमा होणार व कधी पिक कर्ज मिळणार असा प्रश्न या माफित नावे आलेल्या शेतकऱ्यां पुढे उभा आहे.शासनाकडून यादी जाहीर करून कर्ज खात्यावर पैसे जमा करण्यात आले म्हणुन सांगितले जाते मग आजतागायत कर्ज खात्यात पैसे जमा का झाले नाही.म्हणून कर्जखाते अंगठा देऊन झाले निल पण नवीन पीककर्ज मिळण्यासाठी बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नाविलाजाने खरिपाच्या पेरणी करता त्याला खाजगी सावकाराच्या घराची वाट धरावी लागली आहे.तरी शासन व संबंधीत प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे लक्ष घालुन कर्ज माफित बसलेल्या व केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात पैसे वर्ग करून त्वरीत कर्ज देण्याचे आदेश बँकाना द्यावे ही मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
ज्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात कर्ज माफिची रक्कम जमा होवुन खाते निल झाले आहे त्याच शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्यात येत आहे. ज्यांच्या खात्यावर रक्कमच जमा झाली नाही त्याना पिक कर्ज कसे देणार जेव्हा जमा होइल तेव्हाच त्याना पिक कर्ज मिळणार.
– भागवत पोटे, व्यवस्थापकमहाराष्ट्र ग्रामीण बँक
रक्कम जमा कधी होइला कुणी सांगल का?
कर्ज माफित नाव आले आपले सेवा केंद्रावर जावुन केवायसी केली व माफी मिळाली म्हणुन पिक कर्ज घेण्या करता बँकेत गेलो असता कर्ज खात्यात रक्कम जमा नसल्या कारणाने नविन पिक कर्ज देण्यास बँकेने नकार दिला.
-आप्पाराव चिलगर, शेतकरी
जूनच्या पहिल्या आठवड्यात चौथ्या यादीत नाव आले होते. केवायसी केली आहे, परंतु अद्यापही कर्जखात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे जेंव्हा रक्कम जमा होईल तेंव्हाच कर्ज मिळेल असे बँकेकडून सांगितले जाते.
-राहुल गायकवाड, शेतकरी
बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न
दर रविवारी कडकडीत बंद, रात्री 8 ते सकाळी 5 संचारबंदी