घरात नाही खायला भाकर अन् मुलांना म्हणतात स्मार्टफोन वापर?

ऑनलाईन शिक्षणातून (online education) गरीब विद्यार्थी वंचित राहणार
माजलगांव, धनंजय माने – शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्यायल्यावर माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. या वाक्यात बराच मोठा अर्थ दडलेला आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशात आज ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत त्यामागे आपल्या शिक्षण पद्धतीचा मोठा वाटा आहे. तसेच माणसाच्या परिवर्तनाचे शेवटचे न्यायासन म्हणजे शिक्षण आणि शिक्षण घेता आले नाही तर महात्मा फुले यांनी सांगतलेल्या सत्या नुसार “मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, अन् गतीविना शुद्र खचले., हा सगळा अर्नथ अविद्देने केला.” अशीच परिस्थिती निर्माण होईल. म्हणून या सर्व गोष्टी वर मात करण्यासाठी आता खेड्या पाड्यात हि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर भर देण्यासाठी माजलगांव शिक्षण विभाग तयारी करताना दिसत आहे. परंतु घरात एक वेळची भाकर खायचे वांदे आहेत आणि मग स्मार्ट फोन (smartphone education) घ्यायचा कसा असा प्रश्न अनेक गरीब पाल्याच्या पालकाना पडला आहे.

कोरोनाचे संकट संपूर्ण देशासह जगावर पडलं आणि संपूर्ण जगच थांबले सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. सहाजिकच शिक्षणाचे क्षेत्र याला अपवाद कसे असणार शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली. लॉकडाउन मार्चमध्ये जाहीर झाले. त्यानंतर या कालखंडात सर्व शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा या कालावधीत शाळेच्या परीक्षा तसेच महाविद्यालयाच्या विविध शाखांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कालखंड कारण या कालावधीत विविध सबमिशन, प्रात्यक्षिक, परीक्षा असल्यामुळे विध्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या शिक्षणाचे फायदे तंत्रज्ञान विकास या क्षेत्रात भर जास्त भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने मजूर व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात.मोठ्या खाजगी शाळेत प्रवेश मिळायलाच हजारो रुपये डोनेशन म्हणून घेतलेजाते याला आळा घालण्यासाठी शासनाने आरटीई चा कायदा लागू केल्याने काही अंशी गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पण जि.प.च्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणारे शेतकरी, शेजमजूरांच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बघितलेला नाही. तर इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. पण त्यांच्याकडे हा फोन नाही. काही विद्यार्थ्यांना पालकांनी स्मार्ट फोन उपलब्ध केला तरी इंटरनेटचा खर्च कसा करावा हा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या काळात काही खासगी शाळांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद शाळेत अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. त्यांच्या पालकाची स्मार्ट फोन घेण्याची ऐपत देखील नाही मग आशा विद्यार्थ्यांनी काय करावे कि ऑनलाईन शिक्षणापासून वंचीत राहणार या पेक्षा ऑनलाईन ‘शिक्षणाच्या आईचा घो.’ म्हण्याची वेळ विद्यार्थी व पालकावर आली आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्वभूमिवर ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांना रोजगार उपलब्ध नसल्याने पालक आर्थिक अडचणीत आहेत सर्वच पालकाकडे स्मार्टफोन नाहीत. ग्रामीण भागात वाडी , वस्तीवर मोबाईलला रेंज असेलच असे नाही. त्यामूळे बहुसंख्य विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
हफ्ते गोळा करून आणा नाहीतर घरी जावा फायनान्स कंपन्याची कर्मचाऱ्यांना धमकी
नोकरी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा



online educationsmartphone for educationऑनलाईन शिक्षण
Comments (1)
Add Comment