पुणे,प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगात कोरोना सारखा महाभयंकर रोग थैमान घालत आहे.संपूर्ण भारतात गेले ४ महिने झाले लॉकडाउन चालू आहे.लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे.लोकांना यापुढे जगावे कसे हा प्रश्नच पडला आहे.
आणि यातच राज्यातील ९०% जनता ही कर्जबाजारी झाली आहे.आता हे कर्ज फेडायचे तरी कसे या विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. त्यांतच हे फायनान्स कंपनी वाले आपल्या कर्मचाऱ्यांना लोकांच्या घरी पाठवून जबरदस्तीने हफ्ते वसूल करायला भाग पाडतात आणि जर हफ्ते वसूल नाही केले तर कामावरून काढण्याची धमकी देतात.
वास्तविक पाहता रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यापर्यंत कोणतीही वसुली करू नये असे आदेश असताना ही या फायनान्स कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वसुली करत आहेत.पण आम्ही या कर्मचाऱ्यांची पण बाजू समजून घेतली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या फायनान्स कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांला धमकी देतात की तुम्ही वसुली नाही केली तर कामावरून काढून टाकू, तुमचा पगार कमी करू,नाहीतर तुम्हाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू,त्यामुळे हे कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने आणि नाईलाजने हफ्ते वसुली करायला जातात आणि आपल्याच लोकांशी वैर घेतात, आणि त्यांचे जे सिनियर अधिकारी आहेत हे यूपी , बिहार वाले हे सरळ सरळ त्याना आई -बहीण वरून शिवीगाळ करतात.
या कर्मचाऱ्यांना एवढा मानसिक त्रास दिला जातो की बास! आणि हे कर्मचारी ते अधिकारी बोलतील ते निमूटपणे सहन करतात. या कर्मचाऱ्यांच्या जीवावर या फाईनन्स कंपन्या गब्बर झाल्या आहेत.आणि आता याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत.
आता या कंपन्यांच्या दादागिरी पासून या कर्मचाऱ्यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे, यापुढे जर कोणत्याही मराठी कर्मचाऱ्यांला जर या फायनान्स कंपनीने जर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली तर त्या फायनान्स कंपनीच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा नॅशनल सोशालिस्ट पार्टी प्रदेश अध्यक्ष मा.श्री.दिपक कांबळे यांनी दिला आहे.
आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांला फायनान्स कंपनीने हफ्ते वसुलीसाठी त्रास दिला तर त्या कर्मचाऱ्यांने नॅशनल सोशालिस्ट पार्टीकडे लेखी तक्रार करावी आणि यापुढे या फायनान्स कंपन्यांची मराठी कर्मचाऱ्यांवर चाललेली दादागिरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा नॅशनल सॉशालिस्ट पार्टीच्या वतीने फायनान्स कंपन्यांना देण्यात आला आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी फोन कुठून आणू व्हय सायब
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});