सातारा ,प्रतिनिधी – संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे.लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.लोकांना एकवेळचे अन्न पण मिळने मुश्कील झाले आहे.आणि सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केली आहे.
आता जे लोक श्रीमंत आहेत ते एक काय कितीही मोबाईल घेऊ शकतात.पण जिथं एकवेळच्या जेवणाची चिंता आहे तिथे मोबाईल आणायला पैसे कुठून आणणार साहेब! ही आर्त हाक आहे गोरगरीब सामन्य जनतेची.बरं मोबाईल जरी घेतला उसना कुणाकडून त्याला परत इंटरनेट आले.त्याला परत पैसे ?
इथे लोक 10 रु वडापाव खाऊन जगतायात आणि इंटरनेट साठी कुठून पैसा आणायचं ते ही एक प्रश्नच आहे. नाहीतर सरकारने मोबाईलसाठी अनुदान दयावे आणि इंटरनेट पण सरकारी कंपनी कडून मोफत दयावे आणि लहान मुलांची तेवढी क्षमता पण नाही की सलग २-३ तास मोबाईल बघावा आणि बघितलाच तर काय गॅरंटी आहे की त्यानां शिकवलेलं समजले असेल?
म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय एकतर मागे घ्यावा नाहीतर ऑनलाईन शिक्षणासाठी अनुदान दयावे , अशी मागणी माहिती अधिकार आणि पत्रकार समिती सातारा जिल्हा सचिव .श्री.ओंकार घोडके यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.
इ-पासचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासन घेणार मोठा निर्णय
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
यंदाचा गणेशोत्सव होणार साधेपणाने साजरा-मुख्यमंत्र्यांचे आवाहन
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});