कन्नड,प्रतिनिधी – जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी साठी झालेल्या प्रवेश परीक्षेत कन्नड येथील फातिमा कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल मधील कु.मृणाल प्रदीप सनंसे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.मृणाल सनंसे या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवीत असताना जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी मध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रवेश परीक्षा दिली होती.
या परीक्षेमध्ये मृणाल प्रदीप सनंसे हीने यश संपादन केले आहे. त्यामुळे तिची जवाहर नवोदय साठी निवड झाली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये मृणाल प्रदीप सनंसे या विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल फातिमा कॉन्व्हेंट स्कूलचे प्राचार्य सोनिया मॅडम, रत्ना मॅडम तसेच या यशासाठी मार्गदर्शन करणारे प्रकाश जिरेमाळी सर व श्रीकांत झिंजुर्डे सर तसेच शिक्षकांनी मृणाल सनंसे या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.
मिरची लागवड सुधारीत तंत्रज्ञान
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});