पावसाची हजेरी , कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी

  • युरिया खत मिळेना , शेतकरी अडचणीत

माजलगांव (प्रतिनिधी):- शहरासह तालुका परिसरात बुधवारी ( दि . १०) मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली . त्यामुळे कृषी निविष्ठांच्या दुकानांवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे .

असे असले तरी सर्वच क्षेत्रांवर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनचा परिणाम झाला असून , शेतीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असून युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे . जून महिन्याच्या पूर्वसंध्येला ३१ मेच्या रात्री पाऊस बरसला होता . त्यानंतरही एक वेळेस चांगला पाऊस झाल्यामुळे माजलगांव धरणाच्या पाणीपातळीत दीड टक्क्याने वाढ झाली होती.

बुधवारी दिवसभर कडक ऊन आणि प्रचंड गर्मी जाणवत होती . रात्री बाराच्या नंतर ढगांची गर्दी होऊन जोरदार पावसाला सुरवात झाली . दीड ते दोन तासांच्या या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे . शहरातील मोंढा भागात गुरुवारी ( दि .११ ) बी – बियाणे , खते आदी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती .

दरम्यान , खत घेण्यासाठी दुसऱ्या खतासोबतच युरिया देण्यात येत असून , तोही दुकानदारांच्या मनावर दिला जात असल्याने टाळेबंदीमुळे युरिया खत मागणीप्रमाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे .

मागणीनुसार युरियाही मिळेना
तालुक्यामध्ये पंधरा हजार हेक्टर क्षेत्रांवर उसाचे पीक उभे असल्यामुळे बागायतदार शेतकरी हे ऊस पिकाकरिता मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा वापर करत आहेत . परिणामी मोक्यात युरिया खताची तात्पुरती टंचाई भासत आहे . आधीच शेतकरी प्रमाणित खत मिळण्याकरिता परेशान असतो आता मागणीनुसार युरिया खतही मिळेना झाले आहे .

मंडळनिहाय झालेला पाऊस
माजलगांव ३ ९ मिमी .
किट्टी आडगाव ३० मिमी .
तालखेड ५५ मिमी .
गंगामसला ४० मिमी .
नित्रुड २४ मिमी.
दिंद्रुड ३५ मिमी.

“शेतकऱ्यांनी आवश्यकतेप्रमाणे खत घेऊन जावे . पूर्ण हंगामामध्ये लागेल इतके खत एकाच वेळेस घेउन जाण्याची घाई करू नये . प्रत्येक शेतकऱ्याला मागणीप्रमाणे खत मिळेल . अडचण आल्यास पंचायत समितीशी संपर्क साधावा . – सिद्धेश्वर हजारे , कृषी अधिकारी , माजलगांव .

सायबर गुन्हेगारी…

ऑनलाइन प्रवेशाच्या माध्यमातून आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेने केली प्रवेश पंधरवाडयास सुरुवात

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

पेरणीबैल जोडीशेतकरी
Comments (1)
Add Comment