मनमाड,प्रतिनिधी-देशात व राज्यात करोना च्या पार्श्वभूमीवर अवघ्या 60 दिवसापासून सर्वत्र लावून लॉक डाऊन असल्याने मनमाड शहरातील सर्व हात मजूर बेरोजगार व अशा ह्या सर्व नागरिकांचे हाल होत असून कुठल्याही प्रकारची त्यांना कुठलीही मदत न भेटत असल्याने सर्व परिवार उपाशीपोटी घरीच राहून शासनाचे आदेश पाळत आहे अशा या गरीब नागरिकांची रेल्वे कर्मचारी यांच्यावतीने असे गरजू 50 परिवारांना अत्यावश्यक घरगुती किराणा व राशन वाटप करण्यात आले तसेच शासनाचे आदेशाचे पालन सोशल डिस्टन्स ठेवून व मास चा वापर करण्यात आले.
या कार्यक्रमात रेल्वे हॉस्पिटल चे डॉ श्री क्षत्रीय रेल्वे चे सह्ययक अभियंता श्री जी रमेश साहेब श्री एम के शिवहारे साहेब, श्री हेमंत डोंगरे साहेब श्री बोरसे साहेब हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे संयोजक श्री रत्नदीप पगारे चेअरमन रेल्वे को ऑप सोसायटीचे सर्व सर्व पदाधिकारी व श्री गोरख चोरगे, श्री सुनील मायर उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; चौघांवर गुन्हा