राज्य टेनिसव्हॉलीबॉल पंच परीक्षेत : राज्यात दुसरा लिपने सिध्दांत तर नावाडे,भराडे ,रोडगे, इम्तियाज, माळवे,चव्हाण , प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सेलू, प्रतिनिधी –  टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या वतीने जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वागंवाड सर यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने दि. 16 जुलै रोजी राज्य ऑनलाईन टेनिसव्हॉलीबॉल पंच परीक्षेत परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय खेळाडू लिपने सिध्दांत उध्दवराव यांनी 90 मार्कस घेऊन राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले.

प्रथम श्रेणीत सेलू येथील इंजिनिअर कमलेश सतिश नावाडे (80), जिंतूर येथील सहशिक्षक रमेश जानकीराम भराडे (79), राष्ट्रीय खेळाडू निखिल मनोज रोडगे(77) राष्ट्रीय खेळाडू मंहमद इम्तियाज (77), राष्ट्रीय खेळाडू निलेश गणेश माळवे (76) राष्ट्रीय खेळाडू स्वप्निल मारोती चव्हाण (76) मार्कस घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

टेनिसव्हॉलीबॉल खेळाच्या जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धेत या पंचाना कामगिरी करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन itचा उच्चंतम निकाल बदल राज्य उपाध्यक्ष खा.संजय जाधव, जिल्हाध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर नावाडे, प्रभाकर सुरवसे, किशोर देशमुख, राज्य सहसचिव गणेश माळवे, सतिश नावाडे, डॉ. माधव शेजुळ, केशव शिंदे, प्रा.नागेश कान्हेकर , डी.सी.चव्हाण, डी.डी. सोन्नेकर, प्रंशात नाईक, आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

पिसर्वेत बँक ऑफ इंडियात “किसानदिन ” साजरा

selu
Comments (0)
Add Comment