जगभरात औद्योगिकक्रांती झाली नवनवीन शोध लागले नवनवीन यंत्र सामुग्री निर्माण झाली. नवीन कल्पनां, उद्योगांला, व्यापाराला, चालना मिळाली. यातुन नविन कारखाने तयार झाले व नवीन रोजगार मिळला. या कारखान्यात जे कामगार काम करतात त्यांना “औद्योगिक कामगार” व ‘संघटीत कामगार’असे म्हणातात. जे लोक वेठ बिगारी काम करतात व औद्योगिक कारखान्यात जे कामगार काम करत नाही उदा.नका कामगार, बांधकाम कामगार, ऊसतोड कामगार, फेरीवाले, अशा सर्व कामगारांना ‘असंघटित कामगार’ असे म्हणतात. हे दोन मुख्य कामगाराचे प्रकार आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
आण्णा भाऊ साठे कामगारा विषयी म्हणतात की, “पृथ्वी हि शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसुन ते कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे”. या वाक्यातून कामगारच महत्व अधोरेखित होत. कामगार हा देशाला व जगाला आपल्या श्रमाने सुंदर,सुखी बनवतो. कवी नामदेव ढसाळ आपल्या ‘कामगार बंधो..! या कविता मध्ये म्हणतात की
“हे जग तुझ्या श्रमावर चालते आहे
किती रे करतोस रक्ताचे पाणी
मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो
बाकीच्यांचा हिशोब कशाला”….!
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
या ओळीतुन कामगारच किती महत्व आहे हे कळत व कामगार हा संपूर्ण जगाला आपल्या कष्टातुन कामातून चालवतो. कामगार हा कारखानदार, मालकाच उत्पादन, उत्पन्न हे घामगाळून रक्ताच पाणी करुन डबल करतो, भरपुर नफा कमुन देतो. कामगारच हा खऱ्या अर्थाने विकासाचा, प्रगतीचा निर्माता आहे. मालकन, सरकार ने त्याच आर्थिक शोषण केले तरी तो आपला काम तेवढ्याच जबाबदारीने इमानदारी ने करत असतो. राष्ट्र, देश, उभारणी करता सगळ्यात जास्त योगदान हे कामगार वर्गाच आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून कवि नामदेव ढसाळ म्हणतात. “ह्या देशाच्या रक्तधमनीतुन वाहणारा तुच लोखंड वितळणारा आणि आकार देणारा ही तुच.” कामगार हा अर्थव्यवस्थाला निर्णयक घटक आहे.तो वस्तु बनवतो नवनिर्मिती करतो आणि सगळ्याच जीवन जगण सुलभ करत असतो.
कवि नारायण सुर्वे सुद्धा आपल्या कविता मधे म्हणतात – की
“कामगारा आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे.”
पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांप्रमाणे पाससाठी संपर्क क्रमांक व ई-मेल जाहीर
या ओळीतून कामगार वर्गाच दुखप्रत जीवन जगण्याची वेदना आणि असह्याता अधिक आक्रमकपणे व्यक्त करत आहेत.
कामगार हा अधिक गरीब होत जातोय हि अर्थव्यवस्थेची अवस्था नारायण सुर्वे यांनी आपल्या या कविता मधुन व्यक्त केलेली आहे. कामगारच शोषण ज्या ज्या ठिकाणी होत त्याठिकाणी त्यावेळी कामगार एकजूट होऊन आपल्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी आपली संघटना तयार करून लढा उभारून ते प्रश्न संघटीतपणे चळवळीच्या माध्यमातून सोडवतो. आणि या कामगार चळवळीचा इतिहास हा देदीप्यमान आहे. कार्ल मार्क्स या तत्ववोत्याच्या तत्वज्ञान प्रेरीत होऊन कामगारच शोषण मोडीत काढल आणि कामगारन वेगवेगळ्या देशात क्रांती केली राजसत्ता पालट केली. भारतात सुद्धा कामगार चळवळ अधिक भक्कमपणे मजबूत आहे व तीच खूप मोठ योगदान आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यापासुन कॉ.डांगे, कॉ.बी.टी.रणदिवे, गोदावरी परूळेकर, कॉ.नरसय्या आडम, इ.सर्व कामगार नेत्यापर्यंत आहे. पण आज या करोना मुळे सर्व कामगाराचे खूप हाल्ल सुरु आहेत. या लॉकडाऊनमुळे कामगार जागोजागी आटकले आहेत. महाराष्ट्रतील ऊसतोड कामगार हे कर्नाटक, इतर राज्यात, जिल्हामधे आटले. काही कामगार मुंबई, दिल्ली व देशातील विविध भागात आटकुन पडलेले आहेत. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २७ कोटी कामगारच हातावर पोट आहे त्यांची परिस्थिती खूप दयनीय झाली आहे. भुखमरीन मरण्याची वेळ असंघटित कामगारांवर आली आहे. उद्या लॉकडाऊन संपल्यानंतर प्रचंड कामगार कपात होण्याची शक्यता आहे. या कामगारांना सरकार तुंटपुजी मदत करत आहे. कामगार गावाकडे घराकडे जाण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहेत. हि विनंती सरकारने मान्य करावी व सर्व क्षेत्रातील कामगारांना सुखाचे दिवस पुन्हा येओ हिच कामगार दिनी शुभेच्छा..!
मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज – प्रकाश आंबेडकर
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत सुद्धा या कामगार चळवळीच खूप मोठ योगदान आहे. मुंबईतील कामगारांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवी म्हणून कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावली. तसेच या लढ्यामधे शाहिराच योगदान हि अमुल्य आहे, शाहिर अमर शेख, आण्णाभाऊ साठे, अशा अनेक शाहीरनी या लढ्यात जनतेच प्रबोधन केले. या संयुक्त महाराष्ट्र च्या आंदोलनात १०५ लोक हुतात्मा झाले. यामधे काही कामगार सुद्धा शहिद झाले.
खुशखबर! राज्य सरकारने गावी जाण्यासाठी गाईडलाईन केल्या जाहीर; असा करा पाससाठी अर्ज
१ मे १९६० ला हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला व आज या महाराष्ट्राला ६० वर्षा पुर्ण होत आहे. महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रांत आघाडीवर असलेले राज्य. देशात आज महाराष्ट्राला हे स्थान मिळवून देण्यात अनेकांचा सहभाग आहे. राजकारणी, समाजसुधारक, अभ्यासक, कार्यकर्ते, वैज्ञानिक, साहित्यीक, शाहिर, संत, इत्यानी महाराष्ट्र घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहिद झालेल्या 105 शहिदांना व महाराष्ट्राच्या सेवेसाठी शहिद झालेल्या सर्व हुतात्माना “क्रांतिकारी अभिवादन” व बेेळगाव, निप्पानी, करावा. हे भाग महाराष्ट्र सामिल व्हावे आणि सीमा प्रश्नचा तिढा सुटावा. हिच महाराष्ट्र दिनी सदिच्छा..! हा “प्रगतशी , प्रयत्नशील, “पुरोगामी महाराष्ट्र” असाच सर्वोच्च प्रगती पथावर चालत राहो हिच “संयुक्त महाराष्ट्र दिनी व जागतिक कामगार दिन “सर्व जनतेला शुभेच्छा..!
४ मे पासून केंद्र सरकारकडून नवीन गाइडलाईन्स; काही जिल्ह्यांना मिळणार सूट
लेखक – प्रा. ओम पुरी सर
Ompuri9168@gmail.com