कर्जमाफीत एबल(able) पण पीक कर्जासाठी ‘थंब’ने अनएबल(unable)!

माजलगांंव,धनंजय माने  :- शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींची मालिका कायम आहे . शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीच्या निकषात हजारो शेतकरी पात्र(एबल)ठरले आहेत. पीककर्जाची सर्व प्रक्रिया गतीने सुरू असताना केवायसीसाठी थंब( अंगठा ) घेण्याची वेबसाईटच बंद असल्याने पीककर्ज मिळण्यास अपात्र(अन एबल) ठरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

यामुळे बँकेत खेटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून , जिल्हाधिकारी किंवा लिड बँकेच्या व्यवसस्थापणाने याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे अशी मागणी केली जात आहे.

खरीप पेरणीच्या तोंडावर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले. यामध्ये महात्मा जोतिबा फुले कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात प्राधान्य दिले जात आहे. या कर्जमाफीच्या पहिल्या व दुसऱ्या यादीत नावे आलेल्या शेतकऱ्यांनी आपले सकार सेवा केंद्र व सीएससी सेंटरवर जाऊन केवायसी करून कर्ज माफीचा लाभ घेतला.

या शेतकऱ्यांना सध्या कर्ज प्रकरणात प्राधान्य दिले जात आहे. तर तिसऱ्या व चौथ्या यादीत नावे आलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करता थंब( अंगठा ) घेण्यात येणारी साईट लॉकडाऊनपासून बंद आसल्याने यादीत नाव असूनही अंगठ्या ची केवायसी न झाल्याने पीक कर्ज प्रकरणास मुकावे लागत आहे.सर्व साधारण पणे प्रत्यक्ष व्यवहारात कुणाला काहीच द्यायचे किंवा घ्यावे लागते अशा वेळी त्यांना काहीच द्यायचे नाही आणि घ्यायचे नाही.

अशा वेळी हाताचा अंगठा दाखवला जातो. याउलट आता बँकेचे सर्व व्यवहार आँनलाईन झाल्याने अंगठा लावल्या शिवाय व्यवहार होतच नाही. हि कमाल आहे अंगठ्याची.

माजलगांंव तालुक्यात मान्सून पावसाचे आगमन दमदार झाल्याने खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खासगी सावकराचे उंबरटे झिजावण्याची वेळ आली आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी व वंचित शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे निर्देश संबंधीत बँकांना द्यावेत , अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या केवळ घोषणा
पीककर्ज वाटप करताना केवायसी अथवा इतर कुठलीही अडचण येणार नाही. तशा सूचना बँकांना दिल्याच संबंधीत अधिकारी सांगतात. परंतु प्रत्यक्षात बँक अधिकारी कागदपत्र यात शेतीची फेरफार नक्कल , ई केवायसीसाठी अडून बसत असल्याचे दिसते.

महात्मा फुले कर्ज माफीच्या योजनेत नाव आले आहे. परंतु केवायसी बंद असल्याने माफीची पावती निघत नाही. यामुळे बँक खरिपाचे पीक कर्ज देण्यास नकार देत आहे. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत .यावर जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करावी.

यशोदा सोळंके, सुखदेव तौर , शेतकरी

हळद लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील जातीय अत्याचार प्रकरणी वंचित आघाडी चे आंदोलन

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (1)
Add Comment