औद्योगिक वसाहतीचे ग्रहण सुटता सुटेना महानगरातील युवक माजलगांव तालुक्यात परतले ; पण काम नाही

माजलगांव,प्रतिनिधी :- रस्त्यांचे झालेले डांबरीकरण , सुसज्ज पथदिवे , कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर सर्व सुविधायुक्त औरंगाबादच्या एमआयडीसीपेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या येथील औद्योगिक वसाहतीला लागलेले ग्रहण कधी सुटणार ? कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात महानगरातील युवक तालुक्यात परतले आहेत . सध्या ते बेरोजगार झाले आहेत . त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा काहीच फायदा होत नसल्याचा त्यांचा मनोदय झाला आहे.

कल्याण ते विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर माजलगांव औद्योगिक वसाहत आहे . दुसऱ्या बाजूने माजलगांव धरण आहे . वसाहतीमधील प्लॉटचे वाटपदेखील झालेले आहे ; परंतु कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा या वसाहतीवर देखील परिणाम झालेला आहे . सर्व सुविधायुक्त असलेल्या या औद्योगिक वसाहतीला उद्योग उभारणीची प्रतीक्षा आहे .
जिल्ह्यात माजलगांव तालुक्याची सधन तालुका म्हणून ओळख असली तरी ठोस असा रोजगार मिळणारा एकही मोठा उद्योग नसल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मुंबई , पुणे , नगर , नाशिक अशा स्मार्ट शहरात पलायन केले होते ; परंतु कोरोनामुळे हे युवक सध्या परतले आहेत . त्यांच्या हाताला काम नाही . तीन ते चार महिने झाले घरातच बसून असल्याने औद्योगिक वसाहतीचा काहीच फायदा मिळत नाहीये , अशी भावना त्यांच्यात झालेली आहे .

“एमआयडीसीत शासनाकडून उद्योग उभारणीसाठी व उर्वरित सोयी , सुविधांसाठी निधी मिळालेला नाही . त्यामुळे वसाहतीला उद्योगाची प्रतीक्षा आहे . माजलगांवसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग उभारल्यास बेथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या शोधात महानगरात जाण्याची गरज भासणार नाही .
-अंकिता आनंद डाके , युवती .

“येथील औद्योगिक वसाहत लवकरात लवकर सुरू करण्यात येईल , अशी आश्वासने निवडणुकीच्या काळात दिली जातात . प्रत्यक्षात औद्यागिक वसाहतीमध्ये एकही उद्योगधंदा सुरू झाला नसल्याने औरंगाबाद , पुणे , मुंबईसारख्या ठिकाणी रोजगारासाठी जावे लागते . आता कोरोनामुळे रोजगारही बंद झाला आहे .
-रामेश्वर मोरे , युवक .

चिमूर तालुक्यातही शिरला कोरोना

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment