: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत असून तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा मुंबईत मेळाव संपन्न होत आहे. या मेळाव्यातील भाषणात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. त्यामध्ये, निवडणुकांमधील विजय, सध्या आमदारांना दिलेल्या मंत्रिपदाचा कालावधी आणि इतरही बाबींवर भाष्य केलं. राज्य सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी काल मुंबईला होणार होता, म्हणून आज मेळावा घेतला. मात्र, आज नागपुरला शपथविधी होत आहे. तरी देखील आपला मेळावा इथं होत आहे, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit pawar) मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. तसेच, पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात फेब्रुवारी 2022 मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं. मात्र, 3 वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत, असे म्हणत अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केलं. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचा कालावधी देखील त्यांनी सांगितला.
2 महिन्यातच महामंडळांचेही वाटप
मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. त्यानंतर, 2 महिन्यातच महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. कहीजणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे, आता 5 वर्षात मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचं देखील त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, अशी घोषणाच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केली
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात अडीच-अडीच वर्षासाठी मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमच त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, असे दादा म्हणाले.