स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन

 

 परभणी,दि.30(प्रतिनिधी) :
संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर  यांच्या कक्षातच गुरुवारी (दि.30)  दुपारी ठिय्या आंदोलन करीत रोष व्यक्त केला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगांबर पवार, गजानन तुरे,शेख जाफर तरोडेकर, शेषराव शेळके, मुंजाभाऊ लोढे, रामप्रसाद गमे, बाळासाहेब घाटूळ, कृष्णा शिंदे, विशाल शेरे, किरण गरुड, माऊली लोढे, रामजी गरुड, अंकुश शिंदे, श्रीनिवास सूर्यवंशी, काशिनाथ गरुड, काशिनाथ शिंदे आदी कार्यकर्त्यांनी ज्या शेतकर्‍यांच्या जमीनी पूराच्या पाण्याने वाहून गेल्या आहेूत, त्या शेतकर्‍यांची वेगळी वर्गवारी करावी व त्यांनाही तात्काळ मदत करावी. घर पडलेल्या व्यक्तींना घरकूल मंजूर करावे, ई-पीक पाहणीतील जाचक अट तात्काळ दूर करावी आदी मागण्या केल्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी अतिवृष्टीने तडाखा बसलेल्या पिकांचे काही नमूणे सादर केले.यावेळी श्री.वडदकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले आहे.

Comments (0)
Add Comment