धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने खरिवली (सो)गावात’अर्सेनिक अल्बम- ३०’ गोळ्यांचे वाटप  

ठाणे, प्रतिनिधी – संपुर्ण देशात  सद्या कोरोनाने थैमान घातला असून आता शहरी भागासहित ग्रामीण  भागात  देखिल या विषाणुचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शिफारस केल्याप्रमाणे होमिओपॅथिक ‘ अर्सेनिक  अल्बम – ३०’ या गोळ्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून कोरोनाशी लढण्यास साहाय्य करते.

म्हणूनच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे  व धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सल्लागार डॉ.अजित पोतदार  यांच्या सहकार्याने  होमिओपॅथिक  ‘अर्सेनिक  अल्बम –  ३०’  या  गोळ्यांचे वाटप शहापूर तालुक्यातील किन्हवली विभागातील खरिवली (सो) गावात एकुन १०० कुटुंबाना वाटप करण्यात आले.

सदर वाटपाच्या कार्यक्रमासाठी  संदेश हरड ,पंकज हरड तेजस हरड  यांनी गावात स्वता पुढाकार घेत होमिओपॅथिक  ‘अर्सेनिक  अल्बम –  ३०’  या  गोळ्यांचे  वाटप करुन प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यास  सहकार्य केले. तर गावकऱ्यांनी  धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे  आभार व्यक्त केले.

ऑनलाईन शिक्षणासाठी फोन कुठून आणू व्हय सायब

बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी

हफ्ते गोळा करून आणा नाहीतर घरी जावा फायनान्स कंपन्याची कर्मचाऱ्यांना धमकी

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

thane
Comments (0)
Add Comment