परभणीत मंगळवारी युगप्रवर्तक महोत्सवात 70 बुद्धमूर्तीचे वितरण-सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांची माहीती

परभणी,दि 27 (प्रतिनिधी)ः
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिम्मित मंगळवारी (दि.30) सायंकाळी 5 वाजता विष्णु जीनिंग मैदान, अक्षदा मंगल कार्यालयासमोर, वसमत रोड परभणी येथे सुप्रसिद्ध सिनेगायक आनंद शिंदे यांची बहरदार भीमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पहिल्यांदाच भारतात थायलंड देशातील विविध आकाराच्या पंचधातूच्या 70 बुद्धमुर्तीचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्ध हत्तीअंबिरे यांनी शनिवारी (दि.27) पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी डॉ.बी.टी.धुतमल, प्रा.डॉ.भीमराव खाडे, मिलींद सावंत, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे, किर्तीकुमार बुरांडे यांची उपस्थिती होती.
श्री.हत्तीअंबीरे यांनी सांगितले की, मागील 20 वर्षांपासून भीमगीत संगीत रजनी, युगप्रवर्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात 14 एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीत परभणी शहरात उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणार्‍या विविध जयंती उत्सव समित्यांचा, प्रथम द्वितीय व तृतीय रोख बक्षीस, पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. थायलंड देशातील विविध आकाराच्या 4 ते 7 फुटाच्या पंचधातूच्या 70 बुद्धमुर्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून नोंदणी झालेली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महायेरो (कार्याध्यक्ष, अ.भा.भिक्खू संघ), गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिने अभिनेता डॉ. गगन मलिक, विशेष अतिथी म्हणून दक्षिण कोरिया देशातील योंगजो मुन, बून ही किम, किमन् हैयोन, सू जिर्योग मुन, सिने अभिनेत्री प्यूनिसावरापिसीत्कून संडी (थायलंड) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या भिमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक प्रवर्तक महोत्से व बुद्धमुर्ती वितरण समारंभाला महिला, पुरुष, समाज बांधव, युवक-युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा निमंत्रक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे, भीमराव शिंगाडे, प्रा.डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल, भगवान जगताप, डॉ. प्रकाश डाके, प्रा. संजय जाधव, मिलिंद सावंत, अरविंद मक्ते, प्रा. राजेश रणखांबे, सुधीर कांबळे, पंकज खेडकर, प्रा.डॉ. सुनील तुरुकमाने, मंचक खंदारे, दिलीप मालसमिंदर, गौतम हत्तीअंबिरे, अ‍ॅड. हर्षवर्धन गायकवाड, उत्तम गायकवाड, चंद्रशेखर साळवे, प्रदीप जोंधळे, शशिकांत हत्तीअंबीरे, कपिल बनसोडे, अमोल धाडवे, भूषण कसबे, मकरंद बानेगावकर, अजय रसाळ, अजय वाघमारे आदिंनी केले आहे.

Comments (0)
Add Comment