परभणीत रुग्णवाढीचा चढता आलेख कायम,तिसऱ्या दिवशी आकडा वाढला

परभणी,दि 20
परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भयंकर रुग्णवाढ झाली आहे.गुरुवारी (दि.20 ) जिल्ह्यात 232 रुग्ण अढळले आहेत.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ होत आहे.त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत चालली आहे.गुरुवारी जिल्ह्यात 232 रुग्ण अढळले तर 68 रुग्णांना सुट्टी झाली.आतापर्यंत जिल्ह्यात 53 हजार 057 रुग्ण अढळले आहेत.त्यातील 50 हजार 485 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली.तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे1 हजार 299 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.सध्या विविध रुग्णालयात आणि होमआयसोलेशनमध्ये 1 हजार 273 रुग्ण उपचार घेत आहेत.अशी माहीती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

Comments (0)
Add Comment