परभणीत विनाकारण फिरणाऱ्या 220 नागरीकांची केली आरटीपीसीआर
परभणी,दि 23 ः
शहरात संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या 220 नागरीकांची गांधी पार्क येथे रविवारी (दि.23) आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
शहरात लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी व्हावी म्हणून महापालीका आणि पोलीस प्रशासनाने अशा नागरीकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची मोहीम सुरु केली आहे.महापालीका आयुक्त देविदास पवार यांच्या सुचनेवरुन ही मोहीम सुरु आहे.रविवारी शहरातील गांधी पार्क येथे मोहीम राबवण्यात आली.यात 220 नागरीकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
यावेळी महापालीकेचे सहायक आयुक्त अल्केश देशमुख, शिवाजी सरनाईक,स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा ,नगर सचिव विकास रत्नपारखे उपस्थित होते.