अंबरनाथ नगरपालिका नगरसेवक उमेश अनंता पाटिल यांनी सर्व सामान्य गोरगरिबांना मदत केल्याबद्दल “अंबरनाथ मानवसेवा पुरस्कार” जाहिर
अंबरनाथ, जाफर वणू – कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने देशभारत धुमाकुळ घातली असून दि. २४ मार्च २०२० रोजीपासून सरकारने लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यापासुन घरात थांबलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्याने उपासमारिचे सावट लक्षात येताच नगरसेवक अं. नं. प. वॉर्ड क्रमांक १६ चे श्री.उमेश अनांता पाटील यांच्या हस्ते अंबरनाथ पश्चिमेकडील कोहोजगाव, कमलाकरनगर, बालाजीनगर, शिवनगर, चिंचपाडा, काथोडपाडा, मिर्चीवडी, कैलासनगर,नेताजी मार्केट परिसर ,फुलेनगर, उलनचाल, हौसिंगबोड अश्या विविध विभागातील जवळपास 8000 परिसरामधील गरजु लोकांना, कामगार, सर्वसामान्य बेरोजगार नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या सर्व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
ही समाजसेवा करताना दादांनी कधीही राजकारण न करता समाजकारण न आणता अविरतपणे आपल्या आरोग्याचीही पर्वा न करता हे समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे.असे म्हणतात की “जेव्हा आपण कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाची पर्वा न करता लोकांसाठी झटत असतो तेव्हा समाजालाही त्याची दखल घ्यावीच लागते. याकरीता दादांच्या ह्या समाजकार्याची दखल घेऊन “अंबरनाथ व्यापारी संघ व कच्छी विशा ओसवाल जैन संघ अंबरनाथ” यांच्या मार्फत नगरसेवक उमेश अनंता पाटील यांना “अंबरनाथ मानवसेवा पुरस्काराने” जाहिर करून गौरव करण्यात आले आहे. त्याकरीता “दादा सलाम तुमच्या निःस्वार्थ समाजसेवेला” .