अंबरनाथ पूर्वेकडील लोकमान्य टिळक नगर परिसरात नागरिकांना उमेश यादव यांच्या संकल्पनेतून स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध

0 75

अंबरनाथ, जाफर वणू – कोरोनासारख्या रोगामुळे सरकारने लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यापासुन घरात थांबलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्याने पैश्याची महामारी व उपासमारिचे वेळ लक्षात येताच अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर आणि नगराध्यक्षा सौ. मनिषा अरविंद वाळेकर यांच्या सूचनेनुसार व युवासेना उपजिल्हा अधिकारी तथा नगरसेवक अँड निखिल अरविंद वाळेकर यांच्या सहकार्याने युवासेना उपविभाग अधिकारी उमेश रामबहाल यादव ह्यांच्या संकल्पनेतून शिवसेना शाखा लोकमान्य टिळक नगर अंबरनाथ (पूर्व ) या परिसरात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला.

ह्या मध्ये मोलाचे सहकार्य करण्याचे कार्य युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते अनिष सोनपरी, उदय कांबळे, अजय सोमपरी, सचिन पुजारी, हर्षल कोळंबे, मुकेश यादव, विजय चलवादी, नितेश कांबळे, अजय यादव, विशाल जावीर, गणेश विश्वकर्मा यांनी केले. याकरीता परिसरातील नागरिकांनी उमेश यादव यांचे आभार मानले.

error: Content is protected !!