‘अग्निपंखातले कलाम’

0 305
आज ‘वाचन प्रेरणा दिवस’ या निमित्ताने आपल्याला आपल्या देशातील एका पुस्तकप्रेमी ,पद्मविभूषण, भारतरत्न, राष्ट्रपती अब्दुल पादिर जैनुलबदिन कलाम अर्थात ए. पी.जे. कलाम या थोर व्यक्तिमत्वाची आठवण होणे एक भाग्य आहे.
‘ अग्निपंख ‘ कलामांच्या यशाची आणि क्लेशाची  कहाणी . अग्निपंख हे पुस्तक म्हणजे कलामांचे वास्तववादी ,प्रेरणादायी आणि इतरांना मार्गदर्शक आत्मचरित्र.याचे रचनाकार  आहेत  कलमांचे तत्कालीन सहकारी अरुण तिवारी. या पुस्तकामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी या निश्चितपणे कलामांच्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टी आहेत. त्यांचे व्यक्तिगत अनुभव आहेत आणि त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात त्यांनी लिखित स्वरूपात मुद्रित केलेले आहे.  या पुस्तकाची पहिली आवृत्ती एक मे 1999 साली निघाली.  ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन या पुस्तकामध्ये त्यांचे स्वतःचे अनुभव त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक यांचे कुटुंब संबंधित सर्व काही आहे. त्यांच्या लहानपणी गरिबी असल्याने कष्ट सोसले ,आणि त्यातून पुढे जाऊन शिक्षण घेतले. बालपणी शाळेतील दिवस, शाळेची फी भरण्यासाठी केली लहानसहान कामे आणि कॉलेज विद्यार्थी असताना ही शाकाहरी  राहण्याचा निर्णय त्यामागे पैशाचा असलेला अभाव या सर्व बाबींची पुस्तकांमध्ये  नोंद आहे. अग्निपंखाचे अरुण तिवारी रचनाकार आहेत.
सन 1982 पासून  तिवारी साहेब त्यांच्याबरोबर काम करत होते आणि त्यांचा सहवास त्यांना लाभला होता. मग सहवासात येऊन ते प्रभावित झाले. त्यांना खूप सारे प्रयत्न केल्यानंतर कलामांची परवानगी मिळाली आणि त्यामुळे त्यांनी अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र लिहिणार  असं ठरवलं. ते कलामांना म्हणाले की सर ” मी तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अनुभव एका पुस्तकात गुंफू इच्छितो. तुमच्या आयुष्यात घडलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माझ्यासमोर अनुभवरूपाने व्यक्त करावेत असं मला वाटतं ‘.
कलामांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच स्वतःला वैज्ञानिक जगतात मान्यता मिळविण्यासाठी झगडावे लागले. आधुनिक भारतातील विज्ञान क्षेत्राच्या यशापयशाचा जमाखर्च या पुस्तकात कलाम यांनी मांडलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय भावनेची आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी केलेल्या सहकारी प्रयत्नांची ‘अग्निपंख’ ही त्यांच्या कालखंडातील कथा आहे. अब्दुल कलाम सामान्य कुटुंबातील होते. परमेश्वराने ही श्रुष्टि आपल्यासाठी निर्माण केली तिला आपण जपलच पाहिजे. डॉ. कलाम यांनी सांगितलेल्या सर्वच प्रसंगांचा, घटनांचा या पुस्तकामध्ये समावेश झालेला आहे असे नाही , हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आठवणीचे  एक रेखाचित्र आहे ते आपल्यासमोर असं एखाद्या चित्रपटासारखं उभं राहील. त्यांचे बालपण , त्यांचे मोठेपण , तरुण पण या तीनही अंगाचा यात विचार आहे. ते शिक्षण करत असताना त्यांना त्रास झाला असेल, त्यांना लहानसहान कामे करावी लागली असतील तर ते प्रसंग आपल्यासमोर उभे केलेले आहेत.
कलाम नेहमी आईबरोबर स्वैपाकघरात असत .आईने केळीचे हिरवेगार पान समोर ठेवून त्यावर एका बाजूला वाढलेला तो भाताचा ढीग व वरती मसाल्याच्या वासाने घमघमणारे सांबर, तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत घरगुती लोणची असायची तर दुसऱ्या बाजूला खोबऱ्याची स्वादिष्ट चटणी.कलामांचे खूप सारे अनुभव प्रसंग या पुस्तकामध्ये आलेले आहेत. त्याची आई संस्काराची खाण होती तर  वडील परमार्थ करणारे होते आणि  कलाम साहेब अल्लाचे आभार  वेळोवेळी मानत आहेत.  ते म्हणतात की “मी मोठा झालो, प्रश्न विचारण्याइतका समजदार झालो तेव्हा एकदा वडिलांना मी प्रार्थनेमध्ये ‘नमाज का पढतात’ याचा अर्थ विचारला तेव्हा वडील म्हणाले की प्रार्थना मध्ये नमाज पडण्यामागे असले काही नाही  पण  सर्वांनी एकत्र येऊन नमाज पढताना माणसामाणसातील भेदभाव नाहीसे होतात. संपत्ती, वय, जात,धर्म, वंश आणि शरीर सर्व काही विसरून आपण त्या आघातदैवीविश्व शक्तीशी एकरूप होतो”. कलामांना पूर्वीपासूनच वाचनाची आणि चित्रे बघण्याची खूप हौस होती. त्यांच्या गावात दररोज येणारे पेपर असायचे तेव्हा जेव्हा वर्तमानपत्र जवळ असेल त्यावेळेस त्यांचा पेपर टाकणाऱ्या  शमशुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पेपर दारात वाटण्याआधी कलाम त्यातील चित्र बघून घेत असत आणि त्याचे निरीक्षण करत असत. त्यांच्या वडिलांकडून ते प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकले तर आईने त्यांना चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली होती. अर्थात त्याच्या तिनही भावांनी पण आणि एका बहिणीने देखील हात ठेवून त्यांच्याकडून हाच गुण उचलला. शाळेत शिकायला मिळणारे उपजत शहाणपण शिक्षकाकडून  शिकले .तर जलालूद्दीन व शमशुद्दीन यांच्याकडून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा भाव  चेहऱ्यावरचा भाव ,डोळ्याची भाषा ,ओळखायला शिकले. त्यांच्यामध्ये सर्जनशीलतेचा उगम पावत जोश फुलत गेला त्याचे श्रेय त्या दोघांच्या सहवासाला आणि कलामांवर पडलेल्या प्रभावाला देतात.  या पुस्तकात शाळेतील काही प्रसंग पण या ठिकाणी ,नमूद केलेले आहेत. तर त्या प्रसंगामध्ये एकदा लक्ष्मणशास्त्री म्हणतात की “या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचे बीज उत्पन्न होईल असे कृत्य आपण करू नये’. कलाम लहानपणापासूनच हुशार होते. वाचनाचा छंद होता. पुस्तकं त्यांना आवडायचे आणि म्हणूनच त्यांनी पुस्तक वाचत असताना कित्येक तास वेळ ते लायब्ररीमध्ये घालत असत.एखादी गोष्ट समजण्यासाठी  त्याच्या मुळापर्यंत जाणे, त्याच्यामागे असलेले शास्त्रशुध्द निकष शोधून त्यातून योग्य निष्कर्ष मिळेपर्यंत पिच्छा पुरवत असत. त्यांनी पुस्तकात भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपकवाहन  ‘अग्नी ‘ क्षेपणास्त्र ही कलामांनी देशासाठी खोलवर केलेली फार मोठी गुंतवणूक आहे. त्या गुंतवण्याचा परिपाक म्हणून 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अनुस्पोटाशी त्यांचा संबंध आला. ही देशातील फार मोठी गुंतवणूक होती. त्यानंतर देशातील तीन संशोधन केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वाटेला अवकाश संरक्षण खाते आणि अनुशक्ती यांच्याशी संबंधित अशी ती संस्कृती संशोधन केंद्र होती. तसेच कोणत्याही देशाला वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी, विकासासाठी आर्थिक सुबत्येबरोबरच संरक्षण सुबत्ता व्यवस्थित असणे जरुरी असते.
अग्निपंख वाचत असताना आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळेल.होणाऱ्या चुका व त्यापासून घेतलेला बोध यांचा   समावेश आपल्याला दिसेल. श्री. वाय. एस.राजन,शिवथनु पिल्ले,अग्रवाल, प्रल्हाद, प्रसाद राव,सलवान यांनी आपल्या आठवणी या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.प्रोफेसर पंडलाई, आणि स्वामिनाथन यांनी या पुस्तकाचे समीक्षक दृष्टीने परीक्षण केले. डॉ. सोमराजू डॉ.अंजना तिवारी,तसेच छायाचित्रकार श्री. प्रभू यांच्यासारख्या अनेक लोकांनी हे पुस्तक परिपूर्ण करण्यासाठी हातभार लावला. आपणही आजच्या दिवशी कलमांच्या स्मृती जाग्या करताना “अग्निपंख” हे आत्मचरित्र वाचून अग्निपंखातले कलाम जवळून अनुभवावे हीच अपेक्षा.
रज्जाकभाई शेख 
श्रीरामपूर  जि. अहमदनगर 9665778558
error: Content is protected !!