अधिक दराने माल विकतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई -पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा

0 98

■ नवीन दुकाने उघडण्याबाबत कुठलाही निर्णय नाही

बुलडाणा, गजानन कायंदे – ‘कृषी साहित्य असो की, बांधकामा क्षेत्राशी निगडीत वस्तू असो, काही दूकानदार मूळ किंमतीपेक्षा चढ्या दराने हे साहित्य विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जो कोणी अधिक दराने माल विक्री करीत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत दिले आहेत.

लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

नवीन दुकानांबाबत कुठलाही निर्णय बैठकीत झाला नाही उलट पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बाहेरून येणार्‍या लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बाहेरून आलेल्यांवर प्रशासनाने पूर्णपणे लक्ष ठेवावे आणि जिल्ह्याच्या सीमांवर अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांना रोखावे, यासंदर्भातही सदर बैठकीत चर्चा झाली.

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

१७ तारखेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. १८ मे पासून चौथा टप्पा सुरु होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे जे काही नवीन निर्देश असतील त्यांचे तंतोतत पालन व्हावे. नवीन निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाने आपले नियोजन तयार ठेवावे, अशी सूचनाही पालकमंत्री महोदयांनी केली.

अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषद सीईओ शण्मुगराजन, उपमुकाअ राजेश लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदिंची उपस्थिती होती.

कयामत कधी येईल ?

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

error: Content is protected !!