अपंगाची नियमित सेवा करणे हेच खरे समाजकार्य-आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

0 96

पालम, दि.२७ (प्रतिनिधी) : नियमित सेवा करणे हेच खरे समाजकार्य आहे अशी प्रतिक्रिया गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ .रत्नाकर गुट्टे यांनी पेठशिवणी येथील विद्या वर्धनी अपंग निवासी विद्यालय या शाळेत भेट दिल्यानंतर व्यक्त केली. याप्रसंगी शाळेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आनंदराव करंजे यांनी आ. डॉ .रत्नाकर गुट्टे यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंडित गडलींगे सर यांनी पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी सोबत उपस्थित असलेले रासपाचे परभणी जिल्हा अध्यक्ष अड संदीप आळनुरे, रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, पालम पंचायत समितीचे माजी सभापती गणेश घोरपडे, बाबासाहेब एंगडे, दत्तराव घोरपडे ,शिवराम पैके,सयद सुभाण तायर खान पठाण ,विनायकराव वाडेवाले ,रुपेश शिनगारे ,माजी सैनिक कुशबा हंगरगे ,एकनाथराव शेटे ,बाबुराव करंजे ,रामकिशन गुंटे सर ,रमेश शिनगारे ,दत्तराव करंजे ,भगवान करंजे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आ. डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की ,आज मी पेठशिवणी येथील अपंग निवासी विद्यार्थ्यांच्या शाळेला भेट दिली, या शाळेचे भौतिक वातावरण पाहून मला आनंद वाटतो ,खरेतर कोरोनाच्या संकटामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवावे लागले .कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रासह सर्व क्षेत्रावर संकट कोसळले आहे. विद्यार्थी शाळेत असते तर आज माझी भेट झाली असती, त्यानंतर मला मनापासून आनंद वाटला असता, संस्थापक अध्यक्ष अनंतराव करंजे यांनी अपंग क्षेत्रातील मतिमंद मूकबधिर अपंग आधी विद्यार्थ्यांसाठी संस्था स्थापन करून शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत .तसेच त्यांनी सर्व सुसज्य व्यवस्थेसह विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था शाळेमार्फत केली आहे. अपंग विद्यार्थ्यांची दैनंदिन सेवा नियमित करणे खरोखर हे सामाजिक कार्य आहे .त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया या वेळी आ.गुटे यांनी व्यक्त केली . यावेळी सुत्रसंचालन व प्रस्ताविक भगवान करंजे यांनी केले .

error: Content is protected !!