अपूर्वाच्या अपूर्व कामगिरीने भावाला मिळाले नवजीवन !लिव्हर केले दान

0 105

दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट ( वर्धा) ,दि 29ः
तुला नकळतपणे समजून काय समजायचं
तुझ्या सारखी बहीण दिली म्हणून
देवाला हात का नाही जोडायचे !

असेच आज डॉ प्रसन्न राठी मनोमन म्हणत असेल.आणि कारणही तसेच.यकृताच्या आजाराने जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या डॉ प्रसन्ना राठी याच्या साठी धावून आली ती त्यांची चुलत बहीण अपूर्वा. आणि या 30 वर्षाच्या अभियंता असलेल्या तरुणीने आपल्या चुलत भावाला आपल्या लिव्हरचे दान केले आणि बहीण-भावांच्या पवित्र नात्याला एका उंचीवर नेऊन ठेवले.
एका सुशिक्षीत परिवारातील ही घटना अमरावती येथील डॉ चंद्रकांत राठी यांचा डॉ असलेला मुलगा प्रसन्न हे मागील चार वर्षांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते.त्यांचे शरीरात यकृत रोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याची गरज होती.पण हे दान देणार कोण ? राठी परिवारांकडून दानदात्यांचा शोध सुरू झाला.पण काहीना काही कारणांनी दान दाता मिळत नव्हतें.लढाई जीवन मरणाची होती.आपला तरुण डॉकटर असलेल्या चुलत भावाला यकृताचे दान देण्याचा निर्णय डॉ प्रसन्नाजींच्या अभियंता असलेल्या त्याची चुलत बहीण अपूर्वा हिने घेतला.तिला १४ महिन्यांच छोटेसे बाळ.त्यातच पती आणि सासू सासरे काय म्हणतील ही भीती.पण झाले भलतेच ! अपूर्वाने आपल्या चुलत भावाला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला आणि क्षणात पती सासू सासरे ठामपणे तिच्या निर्णयाच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले.अपूर्वाची आई डॉ कल्पनाजी व वडील डॉ.श्याम हे दोघेही डॉकटर. आणि आपल्याच पुतण्यासाठी चक्क आपलीच मुलगी यकृताचे दान द्यायला तयार म्हटल्यावर त्या माय-बापांची छातीही अभिमानाने भरून आली.अपूर्वांच्या धाडशी निर्णयाने चिंताग्रस्त राठी परिवाराच्या जीवनात आनंदाची पहाट निर्माण झाली.आणि चेन्नई येथील रेला इंन्स्टिट्यूट मध्ये १५ जून २०२१ ला डॉ प्रसन्न यांच्यावर यशस्वीपणे यकृत रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
येथील युवा व्यवसायी श्री मनिषजी चितलांगे यांचे डॉ प्रसन्नाजी हे बहीण जावई. मनिषजी यांची बहिणही डॉकटर आहे.आपल्या बहिणीच्या सौभाग्यरक्षणासाठी धावून आलेल्या अपूर्वांच्या धाडशी पणासाठी येथील चितलांगे परिवाराजवळ शब्दच नाहीत.
भारतीय संस्कृतीत दानाचे महत्व सांगितलेले आहे.प्रत्येक व्यक्तीने काहींना काही दान करावे असं आपली संस्कृती शिकविते.कारण दान करण्याच्या प्रवृत्ती मुळे लालसेवर विजय प्राप्त करता येतो.आणि अपूर्वांच्या या अनुपम दानाने तिने कवच कुंडलीचे दान करणाऱ्या अंगराज कर्णाच्या सोबत आपले नाव लिहिले.
संख्या चुलत भावाला स्वतःचे अंगदान करून अपूर्वाने बहीण भावांच्या नात्यातील गोडवा वाढविला.आणि बहीण काय असते ते एका कवीने लिहिलंय,

आई म्हणजे क्षमा,शांती,वात्सल्य
बाबा म्हणजे पालनकर्ता
भाऊ पाठीशी उभा राहणारा
बहीण म्हणजे दुसरी आईच……!

खरच अपूर्वा या काव्य ओळीं नुसार तू डॉ प्रसन्न ची बहिणीबरोबर आईच झालीस आणि वेड्या बहिणीची माया किती वेडी असतेस हे दुनियेला दाखवून दिलेस.
सौ अपूर्वा अतुलजी मंत्री यांच्या धाडसाचे येथे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!