अबब… गेल्या 24 तासांत एक लाख 36 हजार नवे रुग्ण

0 145

शब्दराज, वेब टीम – जगभरातील कोरोना (World’s corona) बाधितांचा आकडा वाढतच असून गेल्या 24 तासांत एक लाख 36 हजार 405 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जगभरात 400857 (corona deaths) रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. मागील 24 तासांमध्ये 1 लाख 36 हजार 405 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 4 लाख 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 लाखापेक्षा जास्त रूगणांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. जगभरातील जवळपास 60 टक्के कोरोना बाधित रुग्ण फक्त 7 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या 43 लाख आहे.

 

जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 20 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. तर आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 18,925 नवे रुग्ण समोर आले आणि 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 19037 नवे रुग्ण आढळून आले आणि 586 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रुस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

7 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण
ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. सहा देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) असे आहेत, जिथे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.13 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा टॉप-6 देशांमध्ये समावेश झाला आहे.

 

error: Content is protected !!