अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी – वाकी बु. येथील शेतकऱ्यांची मागणी
बुलढाणा – येथुन जवळच असलेल्या वाकी बु. येथील शेतकरी उद्धव खंडुजी नागरे यांचे वाकी बु. शिवारात गट नं, ३० मध्ये शेती असुन एकूण क्षेञ ३ हे ८६ आर हरबरा दोन एकर मक्का अडीच एकर शाळू दिड एकर आहे.
नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीठीेने वाकी बु.,धोञा नंदई,प्रिप्री आंधळे,अंढेरा,सेवानगर,बायगांव,मेंडगाव,पाडळी शिंदे,सावखेड नागरे,शिवणी आरमाळ,गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात शेतातील हरबरा,मका,शाळु,गहु पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे आवकाळी पावसाने नुकसान झाल्याने बळी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानाची महसुल विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उद्धव खंडुजी नागरे सह परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.
सध्या कोरोना व्हायरसने सगळीकडे थैमान घातले असुन एकवीस दिवस संपुर्ण भारतभर लाँकडाऊन असुन या काळात शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भाजीपाल्यासह शेतातील सोयाबीन, मका, हरबरा या पिंकाचे भाव गडगडल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला आसुन त्यातच उन्हाळ्या सारख्या दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीठ झाल्याने शेतातील उभ्या पिंकाचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी दोहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.