अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका विरुद्ध वैजापुर पोलिसांची कारवाई
खंडाळा, नईम शेख – वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथे अवैधरित्या हातभट्टी ची दारू विक्री करणाऱ्या एका विरुद्ध वैजापुर पोलीसांकडून कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की,सध्या कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रभाव लक्षात घेता वैजापुर पोलीस प्रशासन कडक बंदोबस्त ठेऊन आहे.वैजापुर चे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,पोलीस नाईक लक्ष्मण गवळी सोबत चालक पोशि जऱ्हाड हे पेट्रोलिंग करत असताना दुपारच्या तीन च्या वेळी खंडाळा येथे गेले असता,तेथील बंदोबस्त खंडाळा चे बिट जमादार मोईस बेग हे बघत होते.त्यावेळेस गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की खंडाळा येथील वडारवाडा या ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्री होत आहे.तेंव्हा खंडाळा येथील पंचांना सोबत घेऊन छापा टाकायला गेले असता पोलिसांना व पंचांना बघून अण्णा सुरे नामक व्यक्ती तिथुन पळून जाताना पंचांनी ओळखले.त्याठिकाणी असलेल्या प्लास्टिक च्या कॅन ची पाहणी केली असता 25 लिटरच्या दोन कॅन एकूण 50 लिटर हात भट्टीची दारू असा 5000 रुपये किंमतीचा दारू साठा मिळाला, त्यानंतर पोलिसांनी बाटली मध्ये कारवाई करण्या करता सॅम्पल घेऊन दारू नाशवंत असल्यामुळे पंचासमोरच नष्ट केली.म्हणून अन्ना मारोती सुरे याच्या विरोधात कलम 65 ई म.दा. का.प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास बिट जमादार मोईस बेग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
“तपास माझ्याकडे सोपविला असून लवकरच फरारी ताब्यात असेल.अवैधरित्या कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही”
मोईस बेग, बिट जमादार