आईच्या गोड जेवण कार्यक्रमाऐवजी पालीच्या आनंदग्रामला मदतीचा हात, कोथाळ्याच्या वैराळे कुटुंबाचा उपक्रम
माजलगांव, प्रतिनिधी – कोरोना साथीला रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून देशात लोक डाऊन करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेकजन अडचणीत आलेले आहेत अशा परिस्थितीत अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या बीडपासून जवळच असलेल्या पाली येथील इनफन्ट इंडिया ( आनंदग्राम ) संस्थेला आपल्या आईच्या गोड जेवणाचा कार्यक्रम रद्द करून मदतीचा हात देण्याचे देण्याचा उपक्रम कोथाळा येथील वैराळे कुटुंबियांनी राबवला आहे .
कोरोना साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे . या जीव घेण्या साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे खुप प्रयत्न करीत आहे . देशात गेल्या महीन्या पासून लाँकडाऊन करण्यात आले आहे . याच दरम्यान कोथाळा येथील राजुबाई गुणाजीराव वैराळे यांचे वृध्दपकाळाने दि . ७ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले आहे . त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम न करता लॉकडाऊन मुळे अनेकांना आर्थिक अडचणी चा सामना करावा लागत आहे . बीड पासून जवळच असलेल्या पाली येथे दत्ताभाऊ
बारगजे , संध्याताई बारगजे हे खुप मोठ्या अनाथ मुलांना सांभाळत आहेतत्यांच्या या इनफन्ट इंडिया ( आनंदग्राम ) या संस्थेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून दि . २५ एप्रिल रोजी गौतम वैराळे यांनी तुर दाळ , मुग दाळ , तांदूळ , साखर , तेल आदी किराणा , भाजीपाला असे सामान देऊन मदतीचा हात दिला आहे . यावेळी पंढरीनाथ सुर्यकर , विष्णू कांबळे , स्नेहल वैराळे , राहुल वैराळे उपस्थित होते .