आई फाउंडेशनकडून रुग्णांना घरपोच भोजन
वासोळ, दि 24(प्रतिनिधी) ःआई फाउंडेशन सटाणा यांच्यावतीने कोरोना पॉझिटिव रुग्णांना कोविड सेंटर असो किंवा होमकॉंरटाईन अशा लोकांना घरपोच जेवण, पाणी पोचवण्याचे काम करत आहे.या कामाची दखल नाशीक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घेतली आहे.
श्री.खांडवी यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाला भेट दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपट(आण्णा) बच्छाव, महेश बच्छाव परिवाराकडून गरजू रुग्णांना वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,सटाणा ग्रामीण,सहाय्यक पोलीस निरीक्षक,देवेंद्र शिंदे,किरण पाटील हे उपस्थित होते.