आज मनमाड येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला

1 138

मनमाड , प्रतिनिधी – आज मनमाड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील एकात्मता चौक येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आले.

तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरवर शासनाने कठोर कारवाई करावी यासाठी मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कैलास पाटील, अमजद पठाण, रईस फारुकी, राजेंद्र जाधव, सादिक पठाण, योगेश पाटील, हबीब शेख, प्रकाश बोधक, नाना शिंदे, योगेश शिंदे, विठ्ठल नलवडे, अशोक देवरे, दत्ता थोरात, संदीप जगताप, सचिन गरुड आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘या’ राज्यात वाढवला ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन

 

error: Content is protected !!