आदिवासी भागातील रानभाज्या वाढवतायेत रोगप्रतिकार शक्ती

3 210

सुरगाणा, प्रतिनिधी – कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी सुरगाणा,पेठ,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण आदिवासी भागातील लोक आपल्या आहारात रानभाज्यांचा वापर करून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवत आहेत. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात. त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे त्या आदिवासी भागातील लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवत आहेत.

आदिवासी भागातील शेवळा, वाघाटा, दिहगडी जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर बाजारपेठतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणाऱ्या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक भर देत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यामधील रानभाज्या बाजारात काही प्रमाणात विक्रीसाठी यायला सुरुवात झाली आहे. या रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने व रासायनिक विद्राव्यापासून मुक्त असणाऱ्या या रानभाज्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदा सुरगाणा, हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, वणी, नांदुरी व सापुतारा या परिसरातून रानभाज्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर असतांना आदिवासी तालुक्यात मात्र ते प्रमाण खुप कमी आहे आणि सुरगाणा तालुक्यात एकही रूग्ण नाही.

अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आणखी १७ व्हेंटिलेटर उपलब्ध

 

error: Content is protected !!