आधार मल्टिस्टेट ही एकविसाव्या शतकाचे पावले ओळखणारी बँक – डॉ. राजे भोसले
माजलगांव, प्रतिनिधी – आधार मल्टीस्टेट ही संस्था एकविसाव्या शतकातील पावले ओळखणारी संस्था असून ही संस्थां ज्याप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी असते त्याचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा असे आधार मल्टीस्टेटचे कार्य आहे असे प्रतिपादन येथील सुप्रसिद्ध डॉक्टर यशवंतराव राजेभोसले यांनी येथे बोलताना केले. आधार मल्टीस्टेट च्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलत होते.
या शिबिराच्या वेळी सर्व प्रकारच्या सोशल डिस्टन्स इन चे नियम पाळण्यात आले होते. यावेळी डॉक्टर राजेभोसले म्हणाले की, माजलगाव शहरातील आधार मल्टिस्टेट ही व्हिजन असलेली बँक आहे. एकविसाव्या शतकाचे अहवाने पेलण्याची क्षमता असलेली संस्था आहे. म्हणून असे कार्यक्रम राबवत आहे. कोविड१९ या विषाणू पासून बँकिंग कामकाज करत असताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे . त्याच बरोबर कर्मचाऱ्यांनी व समाजातील इतर नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम आधार मल्टीस्टेट च्या वतीने डॉक्टरांना मानवंदना देऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, आज देव कोणामध्ये दिसतो आहे तर तो दिवस – रात्र सेवा करणारा कर्मचारी, सीमेवर लढणारा सैनिक, दिवस रात्र लढणारा पोलीस आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवस – रात्र रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर हेच खरे चालते – बोलते देव आहेत असं आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून भारतीय वंशाच्या डॉ उषा मधुसूदन यांना अमेरिकेमध्ये तेथील लोकांनी गाड्यांची रॅली काढून त्यांना मानवंदना देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आधार मल्टीस्टेट च्या वतीने चालते – बोलते देव ज्यांना आपण देऊ म्हणतो असे डॉ यशवंत राजेभोसले यांना मानवंदना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर यशवंत राजेभोसले यांनी, दररोज कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे आणि आहार घेतल्यानंतर जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यानंतर कोरोणासारख्या व्हायरस वरच काय अजून कुठलाही व्हायरस तयार झाला तरी त्यावर आपण मात करू शकतो परंतु लोकांनी आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, दररोज २० मिनिटे व्यायाम किंवा चालणे गरजेचे आहे अशा पद्धतीचे सविस्तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन यावेळी त्यांनी केलं.