आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लोणेरे येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ

0 80

माणगांव, विश्वास गायकवाड – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे आज शनिवार दिनांक २३ रोजी शिव थाळीचा शुभारंभ आमदार गोगावले,यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, मा.प्रमोदशेठ घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्या अमृता हरवंडकर, पंचायत समितीचे उप सभापती राजेश पानावकर, मा सभापती महेंद्र टेडगुरे, मा सदस्य भाऊसाहेब करकरे, विभाग प्रमुख रवी टेंबे, तसेच प्रताप घोसाळकर, इत्यादी उपस्थित होते.

सदर शिवभोजन थाळी केंद्राचा लोणेरे विभागातील सर्व सामान्य मजूर,कष्टकरी उपेक्षित गरजवंत नागरिकांना व रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहन चालकांना फायदा होणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील लोणेरे विभागात देशातील शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱे सुप्रसिद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची येजा सुरू असते या विद्यार्थ्यांना देखील या शिवभोजन थाळी केंद्राचा अत्यल्प दरात लाभ होऊ शकतो. शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाल्या मुळे रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील लोणेरे विभागातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!