आय यु डी पी प्रभागातील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन संपन्न

0 110

मनमाड,प्रतिनिधी – मनमाड शहरातिल आय यू डी पी प्रभागातील मनमाड नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मनमाड नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन सोहळा नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते पार पडला आमदारांनी भूमिपूजन करून श्रीफळ वाढविला.

याप्रसंगी बोलताना आ. सुहास कांदे यांनी नियोजित व्यापारी संकुला मुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्यावर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन असा आशावाद व्यक्त केला. व्यापारी संकुलाच्या निर्मितीकरता प्रयत्न करणारे मनमाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, नगरसेवक शिरसाट, तेजवानी व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.महाराष्ट्र पहिलवान परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल साइनाथ गिडगे ह्यांचा आ.सुहास कांदे ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मनमाड वकिल संघाचे अध्यक्ष ऍड. सुधाकर मोरे यांनी आपल्या मनोगतात या वास्तूमुळे आय यू डी पी परिसराची शोभा वाढणार असून नगरसेवकांच्या कार्यकुशलतेने बद्दल गौरव उद्गार काढले. प्रभागातील नागरिकांच्या वतीने भागिनाथ वडनेरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक महेंद्र शिरसाठ ह्यानी केले. याप्रसंगी विद्यमान नगरसेवक शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, भाऊ पाटील, कैलास गवळी, बब्बू कुरेशी, अमीन पटेल,आदि मान्यवर उपस्थित होते.

८० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

error: Content is protected !!