आशा वर्कर अठरा हजार तर गटप्रवर्तक महीलांना २१ हजार मानधन द्या-आ.रत्नाकर गुट्टे
गंगाखेड, प्रतिनिधी – आशा वर्कर १८हजार तर गटप्रवर्तक महीलांना २१हजार रूपये नियमित व निश्चित मानधन द्या आशी मागणी आ.डाँ रत्नाकर गुट्टे यांनी दि.१७ जुन रोजी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदना द्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्रात सुमारे ७२ हजार आशा वर्कस व ३५०० हुन अधिक गट प्रवर्तक महीला सार्वजनीक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य आभियान अंतर्गत काम करत असुन सार्वजनिक आरोग्य सेवा शहरी भागासह गाव गस्ती वस्ती तांडे इत्यादी ठिकाणी पोहचविण्याचे काम त्या करत आहेत. तसेच आरोग्याबाबत सर्वेक्षण गरोदर मातांना आरोग्य केद्रात घेऊन जाने आसे आनेक प्रकारचे काम त्याना करावे लागतात कोविड-१९ मध्येही या महीला अत्यंत महत्त्वाची भुमिका निभावत आहेत. गेल्या दहा वर्षीपासुन सार्वजनिक आरोग्य विभागात महत्वाची भुमिका बजावणार्या या महीलांना प्रतिमहा मिळणारे अत्यंत कमी असल्याने त्यांना दैनंदिन गरजाही भागवणे अशक्य होत आहे. देशातील बहुतांश राज्यात ही योजना केद्रशासनाच्या बरोबरीने किबहुना जास्त आर्थिक भागिदारी राबवली जाते दुर्देवाने आपल्याकडे आशा वर्कर व गटप्रवर्तक माहीलांना हेळसांड होताना दिसुन येत आहे. याकरीता आशा वर्कस व गटप्रवर्तक महिलांचे जीवनमान सुखकर व्हावे या करीता आशा वर्कस यांना १८ हजार व गटप्रवर्तक महीलांना २१ हजार नियमित व निश्चित मानधन देण्यात यावे आशी मागणी आ.रत्नाकर गुट्टे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
घरात नाही खायला भाकर अन् मुलांना म्हणतात स्मार्टफोन वापर?
राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन