इंजिनियर प्रदीप पेठे यांचे काम आदर्श:-उपमुख्यमंत्री अजित पवार.
भोर,दि 02 (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्यात बांधकाम क्षेत्रात नावाजलेली अनेक व्यक्तिमत्त्व आहेत. ज्या व्यक्तीमत्वांनी केवळ नफ्याचा विचार न करता माझ्या कमाईतून समाजात बांधकाम क्षेत्राबाबत काम करणाऱ्यांचा निश्चित फायदा व मार्गदर्शन होईल असे आदर्श व प्रेरणादायी काम पुण्यातील सुप्रसिद्ध इंजिनियर व कायद्याचा अभ्यास केलेले प्रदीप पेठे यांचे आहे,असे गौरव उदगार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली हे बांधकाम क्षेत्रावर नियमावली आधारित इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अनुवाद प्रसिध्द इंजिनिअर प्रदीप पेठे यांनी मराठी भाषेत करून ते प्रकाशित करून त्या पुस्तकाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते.पवार पुढे बोलताना म्हणाले की,आपण समाजात काम करत असताना आपण समाजाचे देणे लागतो,ही सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने जोपासावी, यातूनच आपला गाव ,आपला परिसर,राज्य यातून देश समृद्धीच्या मार्गावर पोहचेल.
महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात बांधकाम नियमावली एक सारखी असावी या उद्देशाने शासनाने युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली प्रकाशित केली आहे ही नियमावली इंग्रजी भाषेत आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य,ग्रामीण भागातील लोकांना ही नियमावली सहज समजावी या उद्देशाने संपूर्ण नियमावली सोप्या मराठी भाषेत तयार करण्याचे काम पुण्यातील सुप्रसिद्ध इंजिनियर व कायद्याचा अभ्यास केलेले प्रदीप पेठे यांनी केले आहे.यावेळेस पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे व उद्योजक अमर पेठे उपस्थित होते.