इंदिरा नगरातील हातभट्टी दारूबंदीसाठी महिला आक्रमक; पोलिसांना दारू विक्रेत्यांविरोधात दिले निवेदन

0 93

माजलगांव, प्रतिनिधी – शहरातील इंदिरा नगर परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून सदरील दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी परिसरातील महिलांनी पोलिस ठाण्यात काहीवेळ सोशियल डिस्टिंग ठेऊन ठिय्या दिला व पोलिसांना निवेदन दिले.
माजलगांव शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री केल्या जात असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. इंदिरानगर परिसरातील महिलांनी आज बुधवार दि २९ रोजी सकाळी दहा वाजता माजलगांव शहर ठाण्यात इंदिरानगर परिसरात हातभट्टी दारू विक्री केली जात असून ती त्वरित बंद करण्यात यावी या मागणीसाठी सोशल डिस्टिंग ठेवून ठिय्या दिला. यावेळी महिलांनी सदरील परिसरात हातभट्टी दारूविक्री करणाऱ्यांची नावे दिली असून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर कल्पना भिसे, सुशिलाबाई आडागळे, अरुणाबाई पाडुळे, शिवकन्या भिसे, शोभा ईचके, विजयमाला भिसे, सुनिता कांबळे, सनिता जाधव, मांलनबाई मिसाळ इत्यादी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गरिबांना लुटणाऱ्या दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – सत्यभामा सौंदरमल
लॉक डाऊन काळात परवानाधारक दारूविक्री बंद असल्याने हातभट्टी दारू विक्रेत्यांनी डोके मोठ्या प्रमाणात वर काढले . आवाच्या सव्वा भावाने ही विक्री केल्या जात आहे . गरीब दलित वस्त्यांमध्ये हे प्रमाण मोठे असून गरिबांना लुटून लाखोंची कमाई हातभट्टी विक्रीतून केल्या जात आहे . आशा लुटारू दारू विक्रेत्यांवर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी दामिनी दारूबंदी अभियानाच्या संयोजक सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे .

error: Content is protected !!