उदयोन्मुख समाजसेवक – अमोल केंद्रे

0 162

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी सोबतच संचारबंदी लागू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी दिवा येथील गोरगरिबांना अन्नदान करण्याचे महत्वपूर्ण कार्य स्थानिक समाजसेवक अमोल केंद्रे यांच्यामार्फत मागील तीन महिन्यांपासून नि:स्वार्थपणे व अखंडित सुरु आहे. अशा निस्वार्थी समाजसेवकाचा वाढदिवस दि. २५ जून रोजी साधेपणाने परंतु चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. अत्यंत सरळमार्गी व साधी राहणी मात्र समाजसेवेची उच्च आवड असलेल्या अमोल केंद्रे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा देण्यासाठी दिवा येथील अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली.

दिवा शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच दिवावासीयांच्या संकटकाळी, अडचणी व इतर समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटणारे अमोल केंद्रे यांची ओळख केवळ दिवा शहरापुरती मर्यादित न राहता सर्वदूर पोहचली आहे. यामुळेच वाढदिवस प्रित्यर्थ आलेल्या शुभेच्छांमध्ये सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांप्रमाणे चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलावंत अग्रेसर राहिले. तानाजी चित्रपटातील तानाजींच्या वडिलांची भूमिका तसेच डाॅ. बी. आर. आंबेडकर मालिकेतील डाॅ. बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका प्रभावीपणे साकारणारे प्रतिभावंत बाॅलिवूड अभिनेता जगन्नाथ निवंगुने, एक होती राजकन्या व लागिर झालं जी फेम अभिनेता विनोद नरळे, स्वराज्य रक्षक संभाजी व मोलकरीण फेम अभिनेता रवि साळुंखे, माझ्या नवऱ्याची बायको, विठू माऊली फेम अभिनेत्री पूनम शेळके तसेच अभिनेते आदित्य गावडे, विक्की आपटे इ. मान्यवरांनी व्हिडिओ माध्यमाद्वारे समाजसेवक अमोल केंद्रे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

एक प्रसिद्ध सुविचार आहे, People helping people makes this world a better place. समाजसेवक अमोल केंद्रे अखंडितपणे चालवित असलेल्या अन्नछत्र माध्यमातून सदर सुविचाराचा प्रत्यक्षात बोध होतो. हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत तसेच वेळोवेळी राबविण्यात येणारे समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यात त्यांच्या अर्धांगिनी सौ. अश्विनी अमोल केंद्रे यांचा देखील कृतिशील सहभाग असतो.

प्रत्यक्ष तसेच व्हिडिओ, व्हाॅटस अॅप व फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे अमोल केंद्रे यांनी मन:पूर्वक आभार मानले. २८ मार्च पासून दिवा शहरातील नागरिकांना मोफत जेवण देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्हिजन रिस्क्यू एन जी ओ, दोस्ताना जनसेवा फाऊंडेशन,आई फाऊंडेशन, सियाराम मिश्रा युवा फाऊंडेशन, बालदा ग्रुप, समाज विकास फाऊंडेशन, ग्लोबल इंडिया फाऊंडेशन, विद्या ताई जैस्वाल त्याचप्रमाणे इतर सहकारी मित्र प्रवीण निकम, योगेश बनसोडे, आकेश पाटील, विशाल भोसले, पियुष धावडे, बंटी शिंदे, विकास इंगळे, जीलाजित तिवारी, राजेश सिंह, विपीन राय, अनिकेत वीरकर, राहुल जगताप, राहुल शाहू, सचिन सुपेकर, विजय बोऱ्हाडे, प्रवीण उपाध्याय, दिग्विजय मिश्रा, महेश शिकारे, दर्शन खेडेकर, प्रथमेश पेडणेकर, आयुष टेबरें, रितिका कनोजिया, ओंकार दळवी, विवेक विषवकर्मा, गौरव भगत, एकनाथ वायकर तसेच वाढदिवसानिमित्त १५० परिवारांना राशन वाटप करणारे रवींद्र जाधव यांचेही मनःपूर्वक आभार मानले व कृतिशील सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

–सुधीर कनगुटकर

शेतकऱ्यांपुढे प्रश्न : दुबार पेरणी करायची कशी?

 

error: Content is protected !!